धडगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 20:50 IST2019-04-22T20:50:02+5:302019-04-22T20:50:27+5:30
अपघात : धडगाव तालुक्यातील घटना

धडगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मोजरा ते खांडबारा रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत २८ वर्षीय ठार झाला़ ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली़
गितेश रुपा वळवी रा़ सल्लीबार आमलीपाडा ता़ अक्कलकुवा हा युवक दुचाकीने मोजरा ते खांडबारा यादरम्यान रस्त्यावरुन जात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली़ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने या रस्त्यावरच्या धोकेदायक वळणाकडे दुर्लक्ष करत गितेश वळवी याच्या दुचाकीला धडक दिली़ धडकेत गंभीर जखमी झाल्याने गितेश याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ अपघात घडल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला़ याबाबत दिनेश शिवा वळवी यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़