गंगापूरजवळ अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:16 IST2019-10-01T12:15:54+5:302019-10-01T12:16:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील गंगापूर  गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन नवापुर येथील ...

Youth killed in accident near Gangapur | गंगापूरजवळ अपघातात युवक ठार

गंगापूरजवळ अपघातात युवक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापुर तालुक्यातील गंगापूर  गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन नवापुर येथील युवक ठार झाला़ सोमवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडली़
रतन कांतीलाल भोई  (25) असे मयत युवकाचे नाव आह़े मयत रतन हा त्याचा मित्र दिपेश तुकाराम जावरे याच्यासोबत एमएच 39़ टी ़ 8321 या दुचाकीने नवापुर येथून नंदुरबारकडे जात होता़ गंगापूर गावाजवळ समोरुन येणा:या जीजे 26 एस 5424 या दुचाकीसोबत त्यांची धडक दिली़ धडकेत रतन भोई हा दुचाकीसोबत बराच अंतर घसरत गेल्याने त्याच्या गंभीर मार लागून रक्तस्त्राव झाला होता़ यात त्याचा  जागीच मृत्यू झाला तर दिपेश याला जागोजागी गंभीर जखमा झाल्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालय व तेथून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल़े अपघताग्रस्त दुसरा दुचाकीस्वार मोहन जालूराम चौधरी याने डोक्यावर हेल्मेट घातले असल्याने त्याचा जीव बचावल्याचे सांगण्यात येत आह़े घटनेमुळे नवापुरात हळहळ व्यक्त होत आह़े 
याबाबत कृष्णा गंगाराम भोई यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मोहन जोलूराम चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेश येलवे करत आहेत़ 
 

Web Title: Youth killed in accident near Gangapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.