दुचाकी एकमेकांवर धडकल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST2021-04-01T04:31:32+5:302021-04-01T04:31:32+5:30

रजनीकांत विजय इंदवे (वय ३०) असे मयत युवकाचे नाव आहे. रजनीकांत हा एमएच ३९ एजी २१०९ या दुचाकीने ...

Youth dies after two-wheeler hits each other | दुचाकी एकमेकांवर धडकल्याने युवकाचा मृत्यू

दुचाकी एकमेकांवर धडकल्याने युवकाचा मृत्यू

रजनीकांत विजय इंदवे (वय ३०) असे मयत युवकाचे नाव आहे. रजनीकांत हा एमएच ३९ एजी २१०९ या दुचाकीने दुपारी राहूल शालिकराव इंद्रजित याच्यासोबत तळोदा येथून प्रतापपूरकडे येत होते. प्रतापपूर गावाजवळील वीज कंपनीच्या उपकेंद्राजवळ समाेरुन भरधाव वेगात येणाऱ्या एमएच ३९ एएफ ४०७६ या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रजनीकांत इंदवे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मागे बसलेला राहुल हा अपघातात पुलाच्या खाली फेकला गेला. त्याला जबर मुका मार लागला. दरम्यान, धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान त्याचे कुटुंबीयांनी दोघा जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू याठिकाणी एकही डाॅक्टर उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्यांना फोन करुन बोलावल्यावर ते येत नसल्याने नातेवाईकांचा संताप अनावर झाला होता. अर्ध्या तासाने हजेरी लावणाऱ्या डाॅक्टरांनी केवळ सोपस्कार म्हणून तपासणी करुन युवकाला मृत घोषित केले. उपचारासाठी दाखल केले असता, मयत युवक हा श्वास घेत असल्याचे त्याच्या कुटूंबीयांचे म्हणणे आहे. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात अपघाताच्या नोंदणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

Web Title: Youth dies after two-wheeler hits each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.