वाल्हेरी धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:09 IST2019-09-30T12:09:32+5:302019-09-30T12:09:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील वाल्हेरी येथील धबधब्यात पोहोयला गेलेल्या युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...

वाल्हेरी धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील वाल्हेरी येथील धबधब्यात पोहोयला गेलेल्या युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मयत युवक हा मित्रांसोबत सुटी घालवण्यासाठी येथे आला होता़
शुभम मनोहर शिंदे (21) रा.भादवड, ता.नंदुरबार असे मयत युवकाचे नाव असून तो रविवारी शुभम वासुदेव पाटील, अविनाश योगेंद्र गिरासे, दिनेश लक्ष्मण वाघ, कुणाल माळी, कल्पेश भोजू पाटील, कल्पेश माळी रा.सर्व नंदुबार व राहुल आंबालाल चव्हाण रा.निझर यांच्यासोबत वाल्हेरी येथे आला होता़
शुभम हा नंदुरबार येथील जी.टी. पाटील महाविद्यालयात बी.एस्सीचे शिक्षण घेत होता़ महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहून शिक्षण घेणा:या शुभमला रविवारी सुटी असल्यामुळे तो वसतीगृहातीलच मित्रांसोबत वाल्हेरी धबधब्यावर पोहोण्यासाठी आला होता़ शुभव व त्याच्यासोबत असलेले सात जण धबधब्याच्या पाण्यात पोहत असतांना शुभमने धबधब्याच्या खडकावरुन पाण्यात उडी मारली़ दरम्यान पाण्यात पडल्यानंतर पोहता न आल्याने नाकातोंडात पाणी जावून त्याचा मृत्यू झाला़ यावेळी सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर वाल्हेरीचे पोलीस पाटील रवींद्र पाडवी यांच्यासह गावातील युवकांनी पाण्यात उडी घेत शुभमला बाहेर काढले होत़े परंतू बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला़
उपजिल्हा रुग्णालयातच शवविच्छेदन करण्यात आले होते. मयत शुभम याचे आई-वडील आणि नातेवाईकांना घटना कळल्यानंतर त्यांनी तळोद्याकडे धाव घेतली होती़ उपजिल्हा रुग्णालयातील त्यांचा आक्रोश ह्रदय पिळवटणारा होता़ याबाबत अविनाश गिरासे यांनी दिलेल्या खबरीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े