अनकवाडे म्हसावद येथे गळफास घेत युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:38 IST2020-07-09T12:38:13+5:302020-07-09T12:38:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा तालुक्यातील अनकवाडा म्हसावद येथील २० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ...

अनकवाडे म्हसावद येथे गळफास घेत युवकाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : शहादा तालुक्यातील अनकवाडा म्हसावद येथील २० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली़
बुध्या जयसिंग सुकळे (२०) असे मयताचे नाव आहे़ त्याने सासरे रमेश मानसिंग ठाकरे रा.म्हसावद कुंभारवाडा यांच्या घरात कोणीही नसताना घराच्या छताला रूमाल बांधून आत्महत्या केली़ घरच्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी मयतास ग्रामीण रुग्णालयात आणले होते़ याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले़ याबाबत त्याची पत्नी बबलीबाई हिने म्हसावद पोलीसात दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोलीस हवालदार ठाकरे करत आहेत़