रेल्वेखाली आल्याने ब्राम्हणपुरीच्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:35 IST2020-06-14T12:35:27+5:302020-06-14T12:35:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/ब्राम्हणपुरी : ब्राम्हणपुरी येथील युवकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारात घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात ...

A youth from Bramhanpuri died after falling under a train | रेल्वेखाली आल्याने ब्राम्हणपुरीच्या युवकाचा मृत्यू

रेल्वेखाली आल्याने ब्राम्हणपुरीच्या युवकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार/ब्राम्हणपुरी : ब्राम्हणपुरी येथील युवकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारात घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपघात की आत्महत्या याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, गावात हळहळ व्यक्त होत आहे.
संजय सखाराम पाटील (३५ ) रा.ब्राम्हणपुरी, ता.शहादा असे मयत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणपुरी येथील संजय सखाराम पाटील वय ३५ हा युवक गेल्या तीन ते चार दिवसा पासून नैराश्याने घरा बाहेर होता. शुक्रवारी रात्री त्याचा मृतदेह नंदुरबार येथील रेल्वे स्थानकानजीक आढळला. नंदुरबार ते ढेकवद आॅफ लाईनवर एका युवकाचा रेल्वे कटींग होऊन मृतदेह पडला असल्याची माहिती लोकोपायलट यांनी रेल्वे स्थानकात दिली. त्यानंतर शहर पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी युवकाच्या खिशातील मोबाईलच्या आधारे त्याची ओळख पटविली. ब्राम्हणपुरी येथे नातेवाईकांना ही बाब कळविण्यात आल्यानंतर गावात शोककळा पसरली. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A youth from Bramhanpuri died after falling under a train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.