वेली येथे युवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 11:59 IST2019-06-22T11:59:09+5:302019-06-22T11:59:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वेली ता़ अक्कलकुवा येथे शौचालयाचे भांडे डोक्यात मारल्याने युवक जखमी झाल्याची घटना घडली़ 15 ...

वेली येथे युवकाला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वेली ता़ अक्कलकुवा येथे शौचालयाचे भांडे डोक्यात मारल्याने युवक जखमी झाल्याची घटना घडली़ 15 जून रोजी घडलेल्या या घटनेनंतर युवकावर उपचार सुरु होत़े
जयवंत अजमा वळवी हा युवक 15 जून रोजी गावात उभा असताना विनेश रामसिंग वळवी याने मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला़ यादरम्यान विनेश याने रस्त्यावर पडलेले शौचालयाचे भांडे उचलून जयवंत याच्या डोक्यावर मारल़े यामुळे जयवंत हा गंभीर जखमी झाला़ जयवंत वळवी याच्या फिर्यादीवरुन संशयित विनेश वळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े