वागदी येथे नैराश्येतून युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:32 IST2019-08-19T12:32:30+5:302019-08-19T12:32:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी :  वागदी येथील युवतीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 18 ऑगस्ट रोजी घडली. पोलीस ...

Young woman commits suicide in depression at Wagdi | वागदी येथे नैराश्येतून युवतीची आत्महत्या

वागदी येथे नैराश्येतून युवतीची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी :  वागदी येथील युवतीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 18 ऑगस्ट रोजी घडली.
पोलीस सूत्रानुसार, वागदी, ता.नवापूर येथील रजीला खिमा गावीत (19)  हिला पुढील शिक्षण घ्यायचे होते. मात्र तिचे वडील खिमा गावीत हे मागील सहा वर्षापासून वेडसर अवस्थेत असल्याने तिला पुढील शिक्षण घेता आले नाही. ही खंत तिला वेळोवेळी जाणवत होती. शेवटी नैराश्यातून 18 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता वागदी शिवारातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात खबर दिल्याने आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार अरुण कोकणी करीत आहेत.
 

Web Title: Young woman commits suicide in depression at Wagdi