नंदुरबारात किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 11:20 IST2018-04-18T11:20:59+5:302018-04-18T11:20:59+5:30

The young man's murder in the murder of a minor in Nandurbar | नंदुरबारात किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत युवकाचा खून

नंदुरबारात किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत युवकाचा खून

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 18 : मागील भांडणाच्या वादातून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरात मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली़ घटनेनंतर संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात येऊन पोलीस ठाण्यासमोर आरोपींच्या अटकेसाठी ठिय्या देण्यात आला़ 
रविंद्र सोमा सोनवणे (25) रा़पोलीस वसाहत हा मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास साक्री नाका परिसरात गेला असता, त्याठिकाणी  गोलू रघुनाथ चौधरी, जयदीप रघुनाथ चौधरी, लकी दिपक चौधरी व सुनील ईशी यांच्यासोबत त्याचा वाद झाला़ यावेळी त्यांच्यात हाणामारीला सुरूवात झाली़ यादरम्यान चौघांनी  रविंद्र यास बेदम मारहाण केली़ प्रसंगी  रविंद्र याच्या शरीरावर बर्फ फोडण्याच्या कोचा व काठीचा वार करण्यात आल्याने जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला़ त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता, मयत घोषित करण्यात आल़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाकडून साक्री नाका परिसर व नवापूर वळण रस्त्यावर काही ठिकाणी तोडफोड करण्यात येऊन जाळपोळ करण्यात आली़ बुधवारी पहाटेर्पयत शहरात तणाव कायम होता़ 
याबाबत मयताचे वडील पोलीस कॉन्स्टेबल सोमा रतन सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोलू चौधरी, जयदीप चौधरी, लकी चौधरी व सुनील ईशी यांच्याविरोधात पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: The young man's murder in the murder of a minor in Nandurbar