बांबूची झोळी, बोटीने प्रवास करीत सर्पदंश झालेल्या युवकाला आणले दवाखान्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:27+5:302021-06-27T04:20:27+5:30
याबाबत वृत्त असे की, अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नर्मदा नदीकाठावरील जांगठीचा मालपाडा येथील एका युवकाला सर्पदंश झाल्याची माहिती अक्कलकुवा ...

बांबूची झोळी, बोटीने प्रवास करीत सर्पदंश झालेल्या युवकाला आणले दवाखान्यात
याबाबत वृत्त असे की, अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नर्मदा नदीकाठावरील जांगठीचा मालपाडा येथील एका युवकाला सर्पदंश झाल्याची माहिती अक्कलकुवा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील मालखेडे यांना मिळाली. त्यांनी ही बाब पिंपळखुंटा येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण सारक यांना कळविली. मात्र जांगठीचा मालपाडा येथून रस्ता नसल्याने वाहन जाऊ शकत नसल्याने सर्पदंश झालेल्या युवकाच्या नातेवाइकांनी बांबूची झोळी करून एक किलोमीटर पायपीट करीत नर्मदा काठावर आणले. तेथून बोटीद्वारे या युवकाला दुसऱ्या काठावर पोहोचविण्यात आले. डॉ. सारक व चालकाने नर्मदा काठापर्यंत रुग्णवाहिका आणली होती. तेथून रुग्णवाहिकेद्वारे या युवकाला मोलगी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्पदंश झालेल्या युवकाला वेळीच औषधोपचार सुरू केल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली.