चिंचपाडाजवळ कार-मोटारसायकल अपघातात तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST2021-02-07T04:29:25+5:302021-02-07T04:29:25+5:30
चिंचपाडा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चिंचपाडा गावातील वडकुट फाट्याजवळ मोटारसायकल व कारची समोरासमोर ...

चिंचपाडाजवळ कार-मोटारसायकल अपघातात तरुण जखमी
चिंचपाडा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चिंचपाडा गावातील वडकुट फाट्याजवळ मोटारसायकल व कारची समोरासमोर धडक झाल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी चिंचपाडाचे हवालदार दादाभाई वाघ यांनी तत्काळ जखमींना मदत केली व महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली आहे. कार औरंगाबादहून सुरतकडे जात असताना त्याचवेळी नवापूरहून विसरवाडीकडे येत असलेल्या मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यात सागर हरीश गावीत (२२, रा.भोनआमळा, ता.नवापूर) हा जखमी झाला. विसरवाडी येथे पोलीस प्रशिक्षणाच्या खासगी क्लासेससाठी येत असताना हा अपघात झाला. त्यात सागर गावीतला पायाला फॅक्चर व डोक्याला मार लागल्याने त्याला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी नवापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले.