कळंबू येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:23 IST2019-09-02T12:23:28+5:302019-09-02T12:23:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कळंबू, ता.शहादा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ...

Young girl molested at Kalambu | कळंबू येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कळंबू येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कळंबू, ता.शहादा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
प्रकाश अंकुश कुवर, रा.कळंबू असे संशयीताचे नाव आहे. गावातीलच अल्पवयीन मुलीची छेडखानी करून तिचा वेळोवेळी तो पाठलाग करीत होता. मारून टाकण्याचीही धमकी तो देत होता. या प्रकाराला कंटाळून मुलीने फिर्याद दिल्याने प्रकाश कुवर विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक न्हायदे करीत आहे. दरम्यान, शहराहसह ग्रामिण भागात देखील उनाडगिरी करणा:या युवकांची संख्या वाढली आहे. पोलिसांनी अशा टारगट युवकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 
 

Web Title: Young girl molested at Kalambu