सिलींगपूर येथे दारुच्या नशेत गळफास घेत युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:24 IST2019-07-02T12:24:04+5:302019-07-02T12:24:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील सिलींगपूर येथे गळफास घेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजता ...

Yilak's suicide takes place in Siliguri | सिलींगपूर येथे दारुच्या नशेत गळफास घेत युवकाची आत्महत्या

सिलींगपूर येथे दारुच्या नशेत गळफास घेत युवकाची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील सिलींगपूर येथे गळफास घेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली़ 
विशाल विलास नाईक (30) असे मयत युवकाचे नाव असून सकाळी 7 ते 11 या दरम्यान त्याने दारुच्या नशेत घरातील छताला दोरी बांधून गळफास घेतला़ याबाबत मयताची बहीण रेखा विलास नाईक यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े तपास पोलीस नाईक कमलसिंग जाधव करत आहेत़ 
 

Web Title: Yilak's suicide takes place in Siliguri