डाब येथील देवाची होळी यंदा साधेपणाने पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST2021-03-26T04:30:26+5:302021-03-26T04:30:26+5:30

मोलगी : सातपुड्याच्या दुर्गम भागातील डाब येथील देवाची होळी (मोरीराही) गुरुवारी पहाटे सहा वाजता पेटवण्यात आली. यावेळी पुजारांनी विधीवत ...

This year's Holi of God at Dab simply ignited | डाब येथील देवाची होळी यंदा साधेपणाने पेटली

डाब येथील देवाची होळी यंदा साधेपणाने पेटली

मोलगी : सातपुड्याच्या दुर्गम भागातील डाब येथील देवाची होळी (मोरीराही) गुरुवारी पहाटे सहा वाजता पेटवण्यात आली. यावेळी पुजारांनी विधीवत पूजन केले. डाब येथील देवाची होळी पेटल्यानंतर इतर मानाच्या सर्व होळ्या पेटवल्या जातात.

गुरुवारी पहाटे डाब येथे प्रथमच साधेपणाने होलिकोत्सव पार पडला. अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या होलिकोत्सवासाठी धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील मोजके आदिवासी बांधव याठिकाणी हजर होते. यंदा कोणत्याही प्रकारचा मेलादा नसल्याने या भागात शुकशुकाट होता. यावेळी उपस्थित नागरीकांकडून सोशल डिस्टन्सिंग ठेवत ही होळी पेटवण्यात आली. सातपुड्यात डाब (मोरीराही) येथील होळीला महत्त्व असून या होळीला पहिला होळी मानली जाते. यावेळी पुजारांनी पूजन कोरोनाचा नायनाट होवून सर्व सजीवांचे कल्याण होवो अशी प्रार्थना केली. दरम्यान येथील होळी पेटल्यानंतर सातपुड्यात पाळणी करणारे बावा, बुध्या आदींच्या तयारींना वेग आला आहे.

दरम्यान येत्या २८ रोजी काठी येथील राजवाडी होळीसह विविध होळ्या पेटणार आहेत. यासाठी तयारी करण्यात आली असून गुरुवारी काठी येथे होलिकोत्सवाच्या तयारीची आढावा बैठक घेण्यात आली. ही होळीही यंदा साधेपणानेच होणार असून बाहेरील व्यापा-यांना यंदा प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: This year's Holi of God at Dab simply ignited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.