यंदाचा गुढीपाडवा अनेक कुटुंबांना दु:खदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST2021-04-13T04:29:07+5:302021-04-13T04:29:07+5:30

गुढीपाडा सण यावर्षी अनेक कुटुंबांवर संकट घेऊन आला आहे. अनेकांनी आपल्या स्वकीयांना कोरोना महामारीमुळे गमावल्याने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर ...

This year's Gudipadva is sad for many families | यंदाचा गुढीपाडवा अनेक कुटुंबांना दु:खदायक

यंदाचा गुढीपाडवा अनेक कुटुंबांना दु:खदायक

गुढीपाडा सण यावर्षी अनेक कुटुंबांवर संकट घेऊन आला आहे. अनेकांनी आपल्या स्वकीयांना कोरोना महामारीमुळे गमावल्याने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने यावर्षीचा गुढीपाडवा गोडऐवजी दुःख घेऊन येणारा ठरला. गेल्यावर्षीदेखील लॉकडाऊनमधेच हा मराठी नवीन वर्षाचा उत्सव लोकांनी साजरा केला होता. परंतु तो एवढा चटके देणारा नव्हता. यावर्षीचा पाडवा हा अनेकांच्या कुटुंबांना चटके देऊन जाणारा ठरला. सारंगखेडा व परिसरात कोरोना महामारीने कुटुंबातील लाडक्या व कुटुंबप्रमुख यांना या महामारीने हिरावून नेले. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणावर यावर्षी संक्रांत आल्यासारखे वातावरण आहे.

आठ दिवसाच्या अंतराने आई व वडिलांना कोरोनाने हिरावून नेले. माझ्यासारख्या अनेकांच्या कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावर्षीचा गुढीपाडवा माझ्याप्रमाणे अनेक कुटुंबांना चटके लावून जाणारा ठरला.

-संदीप सोनवणे, सारंगखेडा, ता. शहादा

Web Title: This year's Gudipadva is sad for many families