यंदा ‘गुलाल’ विक्रीचा उडाला रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:43 IST2020-08-29T12:43:18+5:302020-08-29T12:43:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावणेदोनशे वर्षाची परंपरा असलेल्या नंदुरबारच्या गणेशोत्सवात मिरवणूका ह्या सर्वाधिक लक्षणीय ठरतात़ स्वागत आणि विसर्जन ...

This year, ‘Gulal’ is on sale | यंदा ‘गुलाल’ विक्रीचा उडाला रंग

यंदा ‘गुलाल’ विक्रीचा उडाला रंग


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पावणेदोनशे वर्षाची परंपरा असलेल्या नंदुरबारच्या गणेशोत्सवात मिरवणूका ह्या सर्वाधिक लक्षणीय ठरतात़ स्वागत आणि विसर्जन मिरवणूकीत नाचणारे भाविक गुलालाने अक्षरश न्हावून निघतात़ यंदा मात्र हे दृश्य दिसलेले नाही़ साधेपणाने होणाऱ्या गणेशोत्सवामुळे हे सर्व थांबले आहे़ परिणामी गुलाल विक्री करणाºया व्यावसायिकांवर अवकळा पसरली असून लाखो रुपयांचा फटका त्यांना बसला आहे़
शहरातील मानाच्या गणपतींसह विविध तालीम संघांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून काढल्या जाणाºया स्वागत आणि विसर्जन मिरवणूकांमध्ये ढोल ताशे आणि लेझिम नृत्य जेवढे आकर्षण असते़ तेवढेच आकर्षण हे उधळण्यात येणाºया गुलालाचे असते़ स्वागत मिरवणूकांपासून ते थेट अनंत चर्तुदर्शीनंतरचे १० दिवस शहराचे रस्ते गुलालाने माखलेले असतात़ मोठ्या प्रमाणात होणाºया गुलालाच्या उधळणीसाठी मंडळांकडून स्वतंत्रपणे गुलाल खरेदीचा बजेट केला जातो़ बहुतांश मंडळ आणि विक्रेते यांचा एकमेकांसोबत संपर्क असल्याने गुलालाची नोंदणी एक वर्षाआधीच झालेली असते़ यंदा साधेपणाने उत्सवाचे आदेश असल्याने गुलालाची आवकच झालेली नाही़ ४गणेशोत्सवात शहरात दोन हजार बॅगा गुलाल हा एका व्यावसायिकाकडून विक्री करण्यात येतो़ शहरातील सहा ते सात ठोक विक्रेत्यांकडे या गुलालाची आवक होते़ दरवर्षी उत्सवाच्या सुरूवातील सात ते आठ ट्रक गुलाल मागवण्यात येतो़ एका ट्रकमध्ये १५ किलो प्रमाणे १ ते दीड हजार बॅगा आवक केली जाते़ साधारण १५० ते २०० रूपयांपर्यंत एका बॅगची किमत निर्धारित आहे़ बहुतांश मंडळांकडून बुकींग करुन घेतली जाते़ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मागणीनुसार शहरात हा व्यवसाय सुरू आहे़ शहरासोबत जिल्ह्याच्या इतर भागातून आणि लगतच्या गुजरात आणि ग्रामीण भागातील गणेश मंडळांकडूनही गुलालाची खरेदी शहरातील व्यापाऱ्यांकडून करण्यात येत प्रमुख अशा सात विक्रेत्यांसोबत सिझनेबल व्यवसाय करणाºया युवकांकडूनही गुलालाची आवक करुन घेतली जात होती़ हा सर्व गुलाल गणेशोत्सवपूर्वी किंवा अनंत चर्तुदर्शीच्या आदल्या दिवसापर्यंत विक्री होवून ५० लाख रूपयांपर्यंतची उलाढाल होत होती़ यंदा मात्र ही उलाढाल पूर्णपे बंद आहे़
४विक्रेत्यांकडून प्रामुख्याने इंदौर आणि उदयपूर येथून गुलाल मागवण्यात येत होता़ कोरोनामुळे मार्चपासूनच वाहतूक बंद असल्याने शहरात गुलालाची आवक झाली नव्हती़ गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असणार हे निश्चित झाल्याने व्यापाºयांनीही मालाची आवक करण्याचा निर्णय घेतला नव्हता़ यातून शहरात यंदा एक गोणीही गुलाल उपलब्ध नाही़ ४नंदुरबार शहरात गणेशोत्सवादरम्यान दोन टप्प्यात बाप्पाचे विसर्जन करण्याची पंरपरा आहे़ या दरम्यान गेल्यावर्षापर्यंत गुलालाची मुक्त उधळण व्हायची़ स्वागतात उधळलेला गुलाल रस्त्यांवर पडून असल्याने रस्ते लालेला दिसत होते़
४पडलेला हा गुलाल उचलून नेण्याचाही उपक्रम काही सेवाभावी करत होते़ प्रामुख्याने गुलालामुळे कोणाला त्रास होवू नये म्हणून पालिकेसोबत हे सेवाभावी काम करत होते़ ४गुलाल विक्री थांबल्याचा फटका केवळ व्यापाºयांनाच नव्हे तर वाहतूकदार आणि हमालांनाही बसला आहे़ व्यापाºयांकडे उत्सव काळात हंगामी रोजगार म्हणून अनेक जण येत होते़ प्रामुख्याने ग्रामीण भागातून येणारे हे हमाल गुलालाची गाडी भरून मंडळांकडे सोपवत होते़ शहरातील काही वाहतूकदार इंदौर आणि उदयपूर येथून गुलाल भरून आणनू देत होते़ त्यांचेही नुकसान झाले आहे़ शहरात दरवर्षी सात ते आठ गाड्यांमधून गुलालाची आवक केली जाते़ यंदा मात्र कोणीही गुलाल आवक करुन घेतलेली नाही़ यंदा गुलालाचा व्यवसायाच नाही़ शहरातील विक्रेत्यांनी आवक केलेली नसल्याने त्यांचे नुकसान टळले आहे़
-जेठमल जैन, व्यापारी,
नंदुरबार
 

Web Title: This year, ‘Gulal’ is on sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.