पाठय़पुस्तकांची यंदा दहा टक्के जादा मागणी
By Admin | Updated: May 19, 2017 15:04 IST2017-05-19T15:04:27+5:302017-05-19T15:04:27+5:30
यंदा पाठय़पुस्तके मंडळाकडून थेट तालुका गटसाधन केंद्रात पुस्तके पोहच

पाठय़पुस्तकांची यंदा दहा टक्के जादा मागणी
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 19 - नंदुरबार जिल्ह्यात यंदा तब्बल 12 लाख 36 हजार 82 पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे. मराठी, गुजराती व उर्दू माध्यमातील इयत्ता पहिली ते आठवीसाठी ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यंदा पाठय़पुस्तके मंडळाकडून थेट तालुका गटसाधन केंद्रात पुस्तके पोहच होणार असल्यामुळे जिल्हा मुख्यालय ते तालुका दरम्यानच्या वाहतुकीचा ताण कमी झाला आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्याथ्र्याना मोफत पाठय़पुस्तके पुरविण्यात येतात. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत 10 टक्के जादा पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. दोन लाख 32 हजार 640 पुस्तक संचांची मागणी करण्यात आली आहे. तालुकानिहाय मागणीमध्ये नंदुरबार तालुक्यात दोन लाख 92 हजार 142 पुस्तके, शहादा तालुक्यात तीन लाख 25 हजार 172, नवापूर तालुक्यात एक लाख 75 हजार 682, तळोदा तालुक्यात एक लाख 17 हजार 113, अक्कलकुवा तालुक्यात एक लाख 87 हजार 466 तर धडगाव तालुक्यात एक लाख 38 हजार 507 पुस्तकांचा समावेश आहे.
आतार्पयत एक लाख 14 हजार 649 पुस्तके मिळाली असून त्यांची टक्केवारी 9.28 टक्के असल्याची माहितीही उपशिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी दिली.
यंदा स्वाध्याय पुस्तिका दिल्या जाणार नसल्याचे पाठय़पुस्तक मंडळाने कळविले आहे. केवळ क्रमीक पुस्तके पुरविली जाणार आहेत. गेल्यावर्षार्पयत प्रत्येक विषयाची स्वाध्याय पुस्तिका दिली जात होती. यंदापासून ती बंद करण्यात आली आहे. तर पुढील वर्षापासून थेट विद्याथ्र्याच्या खात्यात पुस्तकांच्या किंमती इतकी रक्कम टाकली जाणार आहे. त्यामुळे पुस्तके वाटपाचा ताण कमी होणार आहे. गेल्या वर्षी दोन विषयांचे पुस्तके अर्धे शैक्षणिक वर्ष संपले तरी मिळाले नव्हते. यंदा तसे होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.