भाविकांकडून यशवंत तलावाची परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:44 PM2020-02-22T12:44:05+5:302020-02-22T12:44:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : तोरणमाळ येथील गोरक्षनाथ यात्रेनिमित्त तेथील यशवंत तलावासह तलावासह मंदिराला वळसा घालून दोन किलोमीटरची परिक्रमा ...

Yashwant Lake circulates by devotees | भाविकांकडून यशवंत तलावाची परिक्रमा

भाविकांकडून यशवंत तलावाची परिक्रमा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : तोरणमाळ येथील गोरक्षनाथ यात्रेनिमित्त तेथील यशवंत तलावासह तलावासह मंदिराला वळसा घालून दोन किलोमीटरची परिक्रमा हातात तांदूळ घेत व तो तांदुळ पेरत करण्यात येत आहे. यात्रेत आलेले अनेक भाविक मुक्कामी थांबले असून ते यशवंत तलावात पवित्र स्नान करून दर्शनचा लाभ घेत आहे.
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या तोरणमाळ येथे महाशिवरात्रीला भरणाºया यात्रोत्सवानिमित्त भगवान गोरक्षनाथ मंदिरात लाखो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथ यात्रोत्सव २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भरत आहे तेथे मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येत आहे. या ठिकाणी मध्य प्रदेशातील निमाड भक्तगण मोठ्या संख्येने रात्र मुक्कामी राहून जागरण करत आहे. त्यांच्याकडून नैवेद्य तयार करून प्रसाद स्वरूपात दिला जात आहे. यात्रेत व्यापाऱ्यांनी विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी आणले आहे. त्यात भांडी, घरगृती वस्तू संस्कृतीक दागदागिन्यांचा समावेश आहे.
यात्रेत विशेषत: निमाड बांधव व आदिवासी बांधव यांच्या एकरंगी पेहराव यात्रेत आकर्षक ठरत आहे. याठिकाणी पालखी व चैनीचे घटक नसतांनाही भाविकांची श्रद्धेपोटी येथे गर्दी होत असून त्यांच्याकडून नवस फेडण्यात येत आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अनेक जैविक जडीबुटी असल्याचे जाणकारांकडून म्हटले जात आहे. जाणकारांना असलेल्या माहितीप्रमाणे आयुर्वेदिक वस्तु यात्रेत विक्रीसाठी आणल्या आहे.

४यात्रेत परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आले असून या ठिकाणी आदिवासी संस्कृतीतील साहित्य खरेदी करण्यात येत आहे. त्यात शिबली, रंगीबेरंगी गोंडे, तीर कमान, चाळ घुंगरू, रंगीबेरंगी पट्टे यांचा समावेश आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांकडून आगामी भोंगºया बाजाराची तयारी सूरू असल्याचे दिसुन आले.
४यात्रेत अनेक भाविक येत असून त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून काही युवक स्वेच्छेने श्रमदान करीत आहे. या स्वयंसेवकांकडून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे.
४यात्रेसाठी येणाºया भाविकांची संख्या अधिक असून ते मुक्कामीत चथांबले आहे. त्यामुळे कालापाणीपासून थेट दुसºया क्रमांकाच्या पायरीपर्यंत सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रवासी स्वत: परिश्रम घेतांना दिसून आले.

Web Title: Yashwant Lake circulates by devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.