शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

रोडाल्यांमधून याहा मोगी मातेचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:35 PM

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : दुर्गम भागातील डाब, मोलगी व देवमोगरा येथे भरणाऱ्या याहा मोगी माता यात्रोत्सवनिमित्त अवघ्या सातपुड्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : दुर्गम भागातील डाब, मोलगी व देवमोगरा येथे भरणाऱ्या याहा मोगी माता यात्रोत्सवनिमित्त अवघ्या सातपुड्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. होबयात्रा वैयक्तीकपणे यात्रेला जाणाºया भाविकांकडून रोडाल्यांच्या माध्यमातून याहा मोगी मातेची आराधना केली जात आहे. तर सोंगाड्यांच्या कार्यक्रमातूनही मातेचा गजर होत आहे.याहा मोगी माता यात्रेला पौराणिक परंपरेनुसार सुरुवात झाली आहे. नोकरी तथा कामधंद्यानिमित्त बाहेर गेलेले आदिवासी बांधव मुळगावी परतले आहे. या बांधवांच्या उपस्थितीत यात्रोत्सव साजरा केला जात आहे. बहुतांश बांधव याहा मोगी मातेच्या दर्शनासाठी मोलगी, डाब व गुजरामधील देवमोगरा येथे रवाना झाले आहे. भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने तिन्ही ठिकाणी ट्रस्टींमार्फत विविध सुविधा करण्यात आल्या आहे.यात्रेनिमित्त निसर्गपूजक आदिवासी बांधवांच्या प्रतिक्षेतील याहा मोगी यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवानिमित्त मौखिक साहित्य परंपरा जतन करण्याचे कार्य आदिवासींमधील पुंजारा, बोडवा व मोडवी यांनी केले असून ही परंपरा सांस्कृतिक व जीवनमुल्यांच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे ते पटवून देत आहे. त्यात डाब राजमंडलातील राजे व जनता समुहाने भटकंती करून जंगलातील कंदमुळे, फळ-फुल गोळा करीत होते. यासह दाब मंडळातील कोलपासा, देवगोंदारी, विन्यादेव, राजापांठा, तारहामहल, उमरावाणू, हेलबदेव, आगीपांडर, गिंबदेव, पोरबदेव, सिडगोवा, बाबा बाहगोºया या देवतांचा परिचय करुन देत सामुहिक जीवन व शेती करण्याच्या पद्धती मौखिक परंपरेनुसार सांगण्यात येत आहे. शिवाय याहा मोगी मातेच्या जन्मापासून विवाहापर्यंतचा प्रवासावर कथा मांडल्या जात आहे. होबयात्रेत सहभागी भाविकांकडून रोडाली, मौखिक कथा यांंच्या माध्यमातून याहा मोगी मातेची आराधना केली जात आहे. तर मोलगी, डाब व देवमोगरा येथेही कथा म्हटल्या जात आहे.देवमोगरा ता. सागबारा येथील याहा मोगी मातेचे मंदिर गुरुवारी पहाटेस विधिवत व पारंपारिक पद्धतीने पूजन करून भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर दर्शनासाठी येणाºया भाविकांची संख्या वाढू लागली. त्यात संपूर्ण भारतातून आदिवासी बांधवांचा समावेश असून बहुतांश भाविक हे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातून जाणे सोयीचे ठरत असल्याने ते याच मार्गाने जात आहे. तर उत्तर भारतातील भाविक कंवाट व वडफळीमार्गे देवमोगरा येथे पोहोचत आहे.