बारी धरणातील जलसाठय़ाचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:33 IST2019-09-20T12:33:20+5:302019-09-20T12:33:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडाळी : जयनगर, ता.शहादा येथे श्रमदानाद्वारे जलसंधारणाची कामे करण्यात आली होती. बारी धरणातील जलसाठय़ाचे पूजन उपविभागीय ...

बारी धरणातील जलसाठय़ाचे पूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
वडाळी : जयनगर, ता.शहादा येथे श्रमदानाद्वारे जलसंधारणाची कामे करण्यात आली होती. बारी धरणातील जलसाठय़ाचे पूजन उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जलसंधारणाच्या कामासाठी सहकार्य करणा:या ट्रॅक्टर मालकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पुणे कृभको कंपनीचे विभागीय व्यवस्थापक आर.आर. पवार, धुळे येथील विभागीय अधिकारी पियूष नेमा, शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, उपविभागीय अभियंता बेहरे, पं.स.चे अभियंता आर.के. कुवर, सुदर्शन पाटील, के.डी. पाटील, एस.बी. पवार, जयनगरचे तलाठी सुभाष पाडवी, सरपंच मीना सोनवणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी येथील हेरंब गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर जयनगर-उभादगड शिवारातील श्रमदानातून बांधलेल्या बारी धरणात साडी-चोळी, नारळ, पुष्प वाहून जलपूजन करण्यात आले. हेरंब गणेश मंदिरात सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.
उपविभागीय अधिकारी गिरासे म्हणाले की, जयनगर गावातील ग्रामस्थ व शेतक:यांनी लोकवर्गणी गोळा करून श्रमदानाद्वारे एक मोठी चळवळ उभी केली आहे. हे विधायक काम हाती घेऊन जिल्ह्यात जयनगर गावाचा नावलौकिक केला आहे. पाण्याचे संवर्धन करणे काळाची गरज असून बारी धरणातील पाण्याचा परिसरातील गावांना फायदा होणार आहे. जलमित्र जितेंद्र पाटील यांच्या प्रय}ांना ग्रामस्थांचे योगदान लाभल्याने ते शक्य झाल्याचे गिरासे यांनी सांगितले.
या जलसंवर्धनाच्या कामासाठी येथील शेतक:यांनी एकरी एक हजार रुपयेप्रमाणे निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात केली होती. नाम फाउंडेशनचे मार्गदर्शन व प्रशासनाच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास आले. जलसंधारणाच्या कामासाठी येथील शेतक:यांनी विनामूल्य स्वत:चे ट्रॅक्टर तब्बल चार ते पाच महिने गाळ काढण्यासाठी उपलब्ध करून दिले. त्यांचे योगदान खरच कौतुकस्पाद असल्याने ट्रॅक्टर मालकांचा सत्कार उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात ट्रॅक्टर मालक दगडू पाटील, भिका माळी, विठोबा माळी, भगवान पाटील, राजाराम पाटील, किशोर माळी, शरद पाटी, सुनील माळी, कृष्णा माळी, विनोद माळी, अशोक माळी, भरत पाटील, भरत नगराळे, राजाराम पाटील, विनोद माळी, रघुनाथ माळी, पितांबर माळी, तुकाराम पाटील, शरद पाटील, आनंदसिंग गिरासे, गोपाल माळी, अशोक पाटील आदी शेतक:यांनी विनामूल्य ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. कृभको कंपनीतर्फे स्वच्छ भारत निर्मल भारत या मोहिमेअंतर्गत गावात स्वच्छता राहावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच जि.प. मराठी शाळा, ग्रामपंचायत, माध्यमिक शाळा, हॉटेल, बाजारपेठ, मंदिर परिसर आदी 16 ठिकाणी कचराकुंडींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास ईश्वर राजाराम माळी, अजरुन सोनवणे, संदीप माळी, निंभोराचे सरपंच रामचंद्र ठाकरे, हेरंब ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी, अशोक माळी, दीपक गोसावी, अंकुश सोनवणे, अतुल माळी, ग्रा.पं. सदस्य छगन पारधी, भावराव माळी, मोहन पारधी, कोतवाल दयाराम भील व ग्रामस्थ उपस्थित होते.