सामोडे येथील कोरोनाबाधिताने केले प्रकाशा येथील तापी घाटावर पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:47 IST2020-06-25T12:47:27+5:302020-06-25T12:47:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा/लहान शहादे : सामोडे ता़ साक्री येथील कोरोनाबाधित व्यक्तीने प्रकाशा ता़ शहादा येथे धार्मिक विधीसाठी तापी ...

Worship at Tapi Ghat at Prakasha by Corona in Samode | सामोडे येथील कोरोनाबाधिताने केले प्रकाशा येथील तापी घाटावर पूजन

सामोडे येथील कोरोनाबाधिताने केले प्रकाशा येथील तापी घाटावर पूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा/लहान शहादे : सामोडे ता़ साक्री येथील कोरोनाबाधित व्यक्तीने प्रकाशा ता़ शहादा येथे धार्मिक विधीसाठी तापी घाटावर हजेरी लावली होती़ यादरम्यान बाधिताच्या संपर्कात आलेल्या विखरण ता़ नंदुरबार येथील पुजाऱ्यासह १९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे़
दक्षिण काशी प्रकाशा येथे तापी संगमावर धार्मिक विधींसह अस्थी विसर्जनासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक वर्षभरात हजेरी लावतात़ लॉकडाऊनकाळातही येथे हे उपक्रम सुरु आहेत़ दरम्यान १७ जून रोजी साक्री तालुक्यातील सामोडे येथील ४२ वर्षीय व्यक्ती लहान भावाच्या अस्थी विसर्जनासाठी खाजगी वाहनाने आला होता़ सोबत त्याने विखरण ता़ नंदुरबार येथील एका पुजाºयास आणले होते़ दोघांनीही प्रकाशा येथील घाटावर बसून पूजा विधी करत नदीपात्रात अस्थींचे विसर्जन केले होते़ यानंतर बाधित व्यक्ती परत गेला होता़ मात्र १८ जून रोजी प्रकृती खराब झाल्याने त्याने उपचार घेतले होते़ यातून तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने सामोडे गावात खळबळ उडाली होती़ ही माहिती प्रकाशा येथील ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाल्यानंतर त्यांनी तहसीलदार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती़ त्यानुसार बाधिताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात आला़ यातून प्रकाशा येथील एकही जण संपर्कात नसल्याचे स्पष्ट झाले असून विखरण ता़ नंदुरबार येथील पुजारीला क्वारंटाईन सेंटरमध्ये दुपारी रवाना करण्यात आले़ दरम्यान पुजाºयाच्या संपर्कात आलेल्या १९ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ तालुका आरोग्य विभागाचे पथक दिवसभर येथे ठाण मांडून होते़ ग्रामपंचायत सरपंच सुमनबाई पाटील, संजय पाटील, पोलीस पाटील प्रकाश पाटील, उपसरपंच सुपडू ठाकूर यांनी प्रशासनाला सहकार्य केले़ गावात आरोग्य सर्वेक्षण सुरु झाले असून निर्जंतुकीकरण व फवारणी करण्यात येत आहे़
प्रकाशा येथे कोरोनाबाधिताने हजेरी दिल्याच्या माहितीनंतर तलाठी धर्मराज पाटील, ग्रामसेवक बी.जे.पाटील, केदारेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, नंदलाल पटेल, मंदिराचे पुजारी रविंद्र गुरव, नरेंद्र्र गुरव आदींनी तापी घाटावर जावून पाहणी केली होती़ यावेळी स्थानिक नावाडींना सूचना करण्यात येऊन उपाययोजना करण्याबाबत माहिती देण्यात आली़ धार्मिक विधींसाठी येथे येणाऱ्यांनाही सूचना केल्या जाणार आहेत़

प्रांताधिकारी डॉ़ चेतन गिरासे व तहसीलदार डॉ़ मिलींद कुळकर्णी यांनी साक्री तालुक्याच्या तहसीलदारांसोबत संपर्क करुन कोरोनाबाधिताची माहिती जाणून घेत संपर्क साखळीची चौकशी केली होती़ यातून विखरण येथील एकजण संपर्कात आल्याची माहिती स्पष्ट झाली होती़

Web Title: Worship at Tapi Ghat at Prakasha by Corona in Samode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.