Worried about agricultural development Shahada's co-operation meet | शेतीविकासाबाबत उपेक्षाची शहाद्याच्या सहकार मेळाव्यात चिंता
शेतीविकासाबाबत उपेक्षाची शहाद्याच्या सहकार मेळाव्यात चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शेतीच्या विकासाकरीता गुंतवणुक फार कमी आहे ती वाढवणे आवश्यक असून, शेतीत सर्वाधिक गुंतवणूक स्वत: शेतकरी करीत आहे. शेती उत्पादनाला पुरेसा भाव नसल्याने उत्पन्न घटले आहे. पुढच्या काळात शेती मालावर प्रक्रीया वाढवणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे  सहकार भारतीचे राष्ट्रीय संरक्षक तथा  रिझव्र्ह बँकेचे संचालक सतिष मराठे यांनी येथे सांगितले.
लोणखेडा महाविद्यालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित सातपुडा साखर कारखाना व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे व नंदुरबार जिल्ह्यात  सहकार क्षेत्रात काम करणा:या पदाधिकारी व कार्यकत्र्याचा मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, सहकार भारतीचे कोषाध्यक्ष गोपाळराव केले, विनय खटावकर, भारतीय बँक प्रकोष्ट संजय बिर्ला, संघटन प्रमुख दिलीप लोहार, सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विनोद सोनार, धुळे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंग राजपूत, श्रीराम देशपांडे, डॉ.कांतीलाल टाटीया, खविसंचे चेअरमन राजाराम पाटील, व्हा.चेअरमन जगदीश पाटील, जि.प समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, कृऊबाचे सभापती सुनिल पाटील, पुरुषोत्तम नगरच्या सरपंच ज्योती पाटील, उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, महावीर पतसंस्थेचे चेअरमन रमेशचंद चोरडीया, पं.स सभापती दरबारसिंग पवार, सराफ असोसिएशनचे विनोद सोनार आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना मराठे म्हणाले की, सहकार क्षेत्रात चढ उतार येत असतात अशा परिस्थितीत येथील सातपुडा सहकारी कारखाना सुस्थितीत सुरु आहे. हे विश्वासावर अवलंबून आहे. 25 हजाराहून अधिक सहकारी संस्था आज कार्यरत आहेत. गेली दोन वर्ष या क्षेत्राबाबत ग्रामीण भागात नाराजी आहे. देशाच्या कृषी क्षेत्रात नव्या उमेदीने कार्य करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर र्निबध घालण्याचा प्रकार गेल्या काही दशकात झाल्याने याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होवून शेती विकासाकडे दुर्लक्ष केले गेले. 
गहु आणि हरभरा या पिकांकडे आधिक लक्ष दिल्याने शेतीचा खरा विकास झाला नाही. इतर देशांमध्ये पीक उत्पादनावर त्वरीत प्रक्रीया होवून चांगला बाजार भावही मिळतो या उलट भारतात परिस्थिती आहे. ऊस,कापूस आणि तेल बिया यांना आधिक मागणी आहे. परंतु शेती उत्पादनाला भारतात भाव नाही. शेती उत्पादनावर प्रक्रीया करणारे उद्योग उभे करण्याची गरज आहे. शेतीच्या विकासाकरीता गुंतवणुक फार कमी असून, ती वाढवणे आवश्यक आहे. शेतीत सर्वाधिक गुंतवणूक स्वत: शेतकरी करीत आहे. शेती उत्पादनाला पुरेसा भाव नसल्याने उत्पन्न घटले आहे. पुढच्या काळात शेती मालावर प्रक्रीया वाढवणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.
या वेळी दीपक पाटील म्हणाले की, सहकाराची पायाभरणी स्व.पी.के अण्णा पाटील यांनी केली. भरपूर अडचणी आल्यात परंतु अडचणींवर मात करीत सहकार या भागात अबाधित ठेवला. सहकार क्षेत्रात मोठय़ा धाडसाने निर्णय घेतले आहेत. सहकार क्षेत्रात काम करणा:यांचा ज्ञानाचा उपयोग करुन घेतला पाहिजे. सहकार म्हणजे राजकारणा:यांचा अड्डा असे म्हटले जात आहे. यामुळे नैराश्याचे वातावरण पसरत आहे. सहकाराचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला असून तो कर्जबाजारी होत आहे. राजकीय पक्षापेक्षा आपण वैयक्तिक किती कार्य करतो हे महत्त्वाचे आहे. सहकार टिकवायचे असेल तर संघटन मजबूत होणे गरजेचे आहे. संजय बिर्ला म्हणाले, उत्तर महाराष्ट्रातील शहादा ही सहकाराची जननी आहे. बचत गट संपूर्ण समाजाचे उन्नतीचे माध्यम ठरु शकते. प्रास्ताविक सातपुडा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर पाटील यांनी केले.        


Web Title: Worried about agricultural development Shahada's co-operation meet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.