चिंचपाडा येथे ‘आमचे गाव आमचा विकास’ या विषयावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:18 IST2019-11-21T12:18:14+5:302019-11-21T12:18:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : गाव विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणा:या आपले गाव आपला विकास उपक्रमांतर्गत चिंचपाडा ता.नवापूर येथे गणस्तरीय ...

चिंचपाडा येथे ‘आमचे गाव आमचा विकास’ या विषयावर कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचपाडा : गाव विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणा:या आपले गाव आपला विकास उपक्रमांतर्गत चिंचपाडा ता.नवापूर येथे गणस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून विकास आराखडा तयार करण्यासाठी ‘आमचे गाव-आमचा विकास’ हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा पातळीवर धोरणात्मक निर्णय, तालुका स्तरावर पर्यवेक्षकीय कामकाज व ग्रामस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. चौदाव्या वित्त आयोगाद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर मोठा निधी प्राप्त होतो. या सर्वांचा विचार केल्यास सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडे तयार केले तर मिळणा:या निधीतून गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार आहे. या आराखडय़ास गट स्तरावरील तांत्रिक छाननी समितीने योग्य असल्याचे मान्य केल्यानंतर ग्रामसभेच्या अंतिम मान्यतेसाठी व जिल्हा परिषदेकडे पाठविला जाणार आहे.
या विषयावर डी.बी.अढायचे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती धिरसिंग गावीत, ग्रामविस्तार अधिकारी एस.बी.खैरनार, ग्रामसेवक सुरेश गावीत राजू वसावे, राहुल वसावे, रेखा वसावे आदी उपस्थित होते.