धडगाव रुग्णालयात एकाच डॉक्टरवर चौघांच्या कामाचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 12:00 IST2019-09-16T12:00:16+5:302019-09-16T12:00:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : आरोग्य विभागाने नियुक्त असलेल्या चार वैद्यकीय अधिका:यांना इतर ठिकाणी नियुक्त केल्याने धडगाव ग्रामीण रुग्णालयातील ...

धडगाव रुग्णालयात एकाच डॉक्टरवर चौघांच्या कामाचा भार
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : आरोग्य विभागाने नियुक्त असलेल्या चार वैद्यकीय अधिका:यांना इतर ठिकाणी नियुक्त केल्याने धडगाव ग्रामीण रुग्णालयातील एकमेव डॉक्टरवर दिवसभरात 400 रुग्ण तपासणीची वेळ येऊन ठेपली आह़े गेल्या आठवडय़ात येथे नियुक्त असलेले एकमेव वैद्यकीय अधिक्षक डॉ़ संतोष परमार यांनी 483 रुग्णांची तपासणी करत वैद्यकीय सेवेच्या कार्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होत़े
एकीकडे डॉ़ परमार यांच्या सेवाभावाचा सर्वत्र गवगवा होत असताना आरोग्य विभागाने रिक्त असलेल्या चार ऐवजी केवळ 2 वैद्यकीय अधिका:यांची पदे भरुन काढत त्यांना रुजू होण्याचे आदेश दिले होत़े हे दोन्ही वैद्यकीय अधिकारी सोमवारपासून येथे पूर्णवेळ कार्यरत होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात राज्य शासनाने उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा जाहिर केला आह़े यानंतरही याठिकाणी सोयींबाबत अडचणी कायम आहेत़ आरोग्य विभागाकडेच वैद्यकीय अधिकारी नसल्याने याठिकाणी नियुक्त करावे, तरी कोणाला असा प्रश्न आह़े दुर्गम भागात राहून सेवा देण्यास अनेकांची ‘ना’ असल्याने याठिकाणी रिक्त पदांची समस्या दिवसेंदिवस वाढत आह़े
धडगाव ग्रामीण रुग्णालयात दिवसभरात आसपासच्या 150 गाव आणि पाडय़ांवरुन किमान 500 रुग्ण दैनंदिन तपासणीसाठी येतात़ यात त्यांच्यातील काहींचा आजार हा लांबलेला असल्यास त्यांना दाखल करुन घ्यावे लागत़े या रुग्णांना दिवसरात्र सेवा देण्यासाठी येथे 24 तास डॉक्टर नियुक्त करण्याची मागणी आह़े सध्या वातावरण बदलामुळे किरकोळ आजारांसह सर्पदंश, अपघात किंवा इतर गंभीर स्वरुपातील आजारी व्यक्तींना याठिकाणी दररोज दाखल करण्यात येत आह़े यामुळे रुग्णालयाला यात्रेचे स्वरुप आह़े पूर्ण क्षमतेने कर्मचारी नसल्याने सेवा देण्यात अडथळे येत आहेत़ विशेष म्हणजे येत्या काळात धडगाव येथे महिला रुग्णालय व नवजात अर्भक केंद्रही सुरु होणार आह़े तेथेही रिक्त पदांची स्थिती कायम राहिल्यास संपूर्ण आरोग्य सेवा हे केवळ स्वपA ठरणार आह़े
8 सप्टेंबर रोजी डॉ़ परमार यांनी 483 रुग्ण तपासल्याची माहिती आह़े यावेळी त्यांनी दोन शवविच्छेदनांसह दुर्धर आजारांच्या रुग्णांची तपासणी करुन त्यांना संदर्भसेवा मिळवून दिली होती़ एका दिवसात एखाद्या वैद्यकीय अधिका:याने शासकीय सेवेत असताना एवढय़ा रुग्णांची नियमित तपासणी करण्याचा हा एक विक्रम आह़े परंतू रिक्त पदांच्या नाईलाजाने त्यांच्यावर एवढय़ा मोठय़ा संख्येने रुग्ण तपासणी करण्याची वेळ आली होती़ किमान 16 तासांपेक्षा अधिक काळ ते सेवा देत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली आह़े या माहितीची दखल घेतल्यानंतर आरोग्य विभागाने दोघांना नियुक्त केले होत़े परंतू यानंतरही रुग्णांची समस्या मिटण्याची चिन्हे कमीच आहेत़
धडगाव ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी कार्यरत असलेल्या चार वैद्यकीय अधिका:यांना आरोग्य विभागात कायम नियुक्त्या देण्यात येऊन धडगाव तालुक्यातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्यांना रुजू करण्यात आले होत़े त्यामुळे धडगाव ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदे निर्माण झाली़ यानंतर तातडीने आरोग्य विभागाने पर्यायी सोय करण्याची अपेक्षा होती़ परंतू तशी कोणतीही कारवाई झालेली नसल्याने रुग्णांना अडचण येत असल्याचे चित्र आह़े आरोग्य विभागाने याठिकाणी इतर पदांची भरती करावी यासाठी तालुक्यातील नागरिकांकडून निवेदनांद्वारे पाठपुरावा सुरु आह़े