शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

वेळेवर पोहोचण्यासाठी मजुरांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पुरेशी वाहतुक सुविधा उपलब्ध होत नसल्याने वेळेत कामावर पोहोचण्यासाठी प्रकाशा परिसरातील शेतमजूर, बांधकाम कामगारांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पुरेशी वाहतुक सुविधा उपलब्ध होत नसल्याने वेळेत कामावर पोहोचण्यासाठी प्रकाशा परिसरातील शेतमजूर, बांधकाम कामगारांना धावपळ करावी लागत आहे. हे कामगार जीवाचा धोका पत्करुन रिक्षाच्या टपावर बसून प्रवास करीत आहे.जिल्ह्यातील मजुरांना बांधकाम व शेतमजुरीशिवाय दुसरा कुठलाही रोजगार उपलब्ध होत नाही. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रोजगाराच्या समस्या अधिक गंभीर झाल्या आहे. शहरी भागातील मजुरांना कामावर जाण्यासाठी कुठल्याही वेळेस वाहन उपलब्ध होत असते. ही बाब ग्रामीण भागातील मजुरांच्या नशिबात नसल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रकाशा, तºहावद, वैजाली, काथर्दे या भागातील मजुरांना देखील वेळेवर व अपेक्षेनुसार वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाली नाही. या भागात परिवहन महामंडळाच्या फारशा बसेस जात नाही, त्यामुळे तेथील नागरिकांना खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांवरच अवलंबून राहावे लागत आहे. वाहतुकीच्या सुविधेअभावी या भागातील शेतमजूर व बांधकाम कामगारांना वेळेवर कामावर पोहोचता येत नाही. त्यामुळे या कामगारांना अल्पश: खाजगी वाहतुकीवरच विसंबून राहावे लागत आहे.या भागातील बहुतांश रस्त्यांची अरुंद, खड्डे पडलेले, खचलेल्या साईडपट्या अशी परिस्थिती आहे. अशा या रस्त्यांवरुन रिक्षांच्या टपावर बसून मजूरांना प्रवास करावा लागत आहे. ही वाहतुक या मजूरांच्या जीवाला धोक्याची ठरत आहे. धोका असला तरी कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी या मजूरांना कुठलाही पर्याय नसल्यामुळे ते टपावर का असेना बसून वेळेवर नियोजित कामावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. या मजुरांसह अन्य नागरिकांच्या सुविधेसाठी परिवहन महामंडळाकडून आवश्यकतेनुसार बस उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.रिक्षाच्या टपावरुन होणाºया प्रवासी वाहतुकीत रिक्षाचालक अथवा प्रवाशांचा दोष नव्हे हा तर गरिबी व वाहतुक सुविधा उपलब्ध करुन देणाºया यंत्रणेचा असल्याचे म्हटले जात आहे. कामावर वेळेवर न पोहोचल्यास या कामगारांना त्या-त्या दिवसाचा रोज बुडवावा लागतो.या भागातील सर्व मजुरांचा उदरनिर्वाह हा केवळ हातावर अवलंबून आहे. त्यामुळे या मजुरांना एका दिवसाचा रोज बुडाल्यास त्या मजुरासह त्याच्या कुटुंबियांवरही उपासमारीची वेळ येते.कुटुंबियांची संभाव्य उपासमार टाळण्यासाठी मजुरांनी वेळेवर कामावर पोहोचणे अत्यावश्यक असते. त्यामुळे या मजुरांकडून धावपळ करीत मिळेल त्या वाहनाने वेळेतच कामावर पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.प्रकाशा ते काथर्देदिगर या भागातील बहुतांश रस्ते वाहतुकीसाठी प्रतिकुल देखील ठरतात. खचलेल्या साईडपट्ट्या यामुळे प्रवाशांना धोका अधिक जाणवत आहे. अशा परिस्थितीत मजूर प्रवास करीत आहे.