पायपीट करत आलेल्या मजूरांना मिळाला ओलावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:33 IST2020-04-30T12:33:17+5:302020-04-30T12:33:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : गुजरातमध्ये मजुरी करण्यासाठी गेलेले शेकडो मजूर मंगळवारी गुजरात-महाराष्ट्र सीमेवर दाखल झाले होते़ पायपीट करत ...

पायपीट करत आलेल्या मजूरांना मिळाला ओलावा
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : गुजरातमध्ये मजुरी करण्यासाठी गेलेले शेकडो मजूर मंगळवारी गुजरात-महाराष्ट्र सीमेवर दाखल झाले होते़ पायपीट करत आलेल्या मजूरांची अंबाबारी गावाजवळ प्रशासनाने सोय करुन येथे तपासणी केली होती़ येथून या मजूरांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी माणूसकीचे दर्शन घडवत वाहनाद्वारे घरी सोडले़
गुजरात राज्याच्या विविध भागात अडकून पडलेले ६६२ मजूर आपल्या गावी जाण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत सकाळी जिल्ह्याच्या सीमेवर आले होते़ मंगळवारी दाखल झालेल्या या मजूरांची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड, अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार विजय कछवे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी तातडीने गुजरात सीमा गाठली होती़ येथून बहुतांश मजूर नजीकच्या आंबाबारी येथील देहली प्रकल्प परिसरात दाखल झाले होते़ या मजूरांना त्यांच्या गावी पोहोचते करण्यापूर्वी त्यांच्या आरोग्य तपासण्या करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते़ यावेळी शहाद्याचे आमदार राजेश पाडवी यांनीही येथे भेट देत मजूरांची माहिती घेतली होती़
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर उपस्थित असलेल्या ६६२ मजूरांवर डॉ़ योगेश देशमुख व डॉ़ स्वप्नील सूर्यवंशी यांच्यासह आरोग्य पथकाने तपासण्या पूर्ण केल्या होत्या़ सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरु होते़ येथे उपस्थित असलेले बहुतांश मजूर तळोदा तालुक्यातील होते़ तर काही मजूर हे अस्तंबा ,चांदसैली, कालीबेल ता़ धडगाव या परिसरातील होते़मजूरांची आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी चौकशी करत विचारपूस केली होती़
दरम्यान गुजरात राज्यात अडकून पडलेल्या शेकडो मजूरांना तेथील कारखानदार विविध वाहनांमधून महाराष्ट्र सीमेपर्यत सोडून जात असल्याची माहिती समोर आली आहे़ येत्या दोन दिवसात अजूनही काही जत्थे येण्याची शक्यता आहे़
आमदार राजेश पाडवी यांच्यासह तालुका प्रशासनाने ४० च्या जवळपास वाहने तयार करुन दुपारनंतर मजूरांना त्यांच्या कुटूंबियांसह रवाना करण्यास सुुरवात केली होती़ पायपीट करुन आलेल्या मजूरांसोबत लहान मुले ही होती़ या मुलांना खापर आणि अक्कलकुवा येथील सेवाभावी नागरिकांनी दुपारी जेवण देत सोबत कोरडा शिधाही बांधून दिला होता़ तळोदा आणि धडगाव तालुक्याच्या विविध भागात जाणाºया मजूरांना वाहनांमध्ये सोडण्यापूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे, घ्यावयाची काळजी याची माहिती तालुका प्रशासनातील अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून देण्यात आली़ सायंकाळी उशिरा ही वाहने मार्गस्थ झाली होती़ तळोदा तालुक्याच्या विविध गावांमध्ये हे मजूर रात्री उशिरापर्यंत पोहोचले़
तपासणी करण्यात आलेल्या सर्व मजूरांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारुन त्यांना पाठवण्यात आले़ त्यांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना आहेत़
दुपारी आमदार पाडवी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची व्यवस्था करुन दिल्यानंतर उपस्थित मजूरांचा आनंद गगनात मावत नव्हता़
प्रशासन आणि वैद्यकीय पथक यांनी आलेल्या प्रत्येक मजूराची व्यवस्थितपणे नोंद केली आहे़ परत पाठवलेल्या मजूरांना गुजरातमधील कारखानादारांनी मजूरी देण्यासह अन्न पाण्याचीही योग्य व्यवस्था केली नसल्याची माहिती समोर आली आहे़