शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

श्रमयोगी मानधन योजनेपासून तीन तालुक्यांचे कामगार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:49 PM

नंदुरबार : असंघटित क्षेत्रातील कामगारांना सेवानिवृत्तीनंतर दरमहा 3 हजार रुपये निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना लागू करण्यात आली ...

नंदुरबार : असंघटित क्षेत्रातील कामगारांना सेवानिवृत्तीनंतर दरमहा 3 हजार रुपये निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना लागू करण्यात आली आह़े 15 फेब्रुवारीपासून या योजनेचे काम देशभरात सुरु झाले आह़े परंतू जिल्ह्यातील तीन तालुक्यात कामगार नोंदण्याच नसल्याची माहिती असून नोंदणी केंद्राची स्थापना अद्याप जिल्ह्यात झालेली नाही़    जिल्ह्यातील तळोदा, शहादा आणि नंदुरबार या तीन तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील कामगारांच्या नोंदण्या दरवर्षी करण्यात येतात़ यानुसार 8 हजार 559   कामगार नोंदणीकृत आहेत़ योजनेत सहभागी झाल्यानंतर या कामगारांना दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शन देण्याचे निश्चित मानले जात आह़े तर दुसरीकडे अक्कलकुवा, धडगाव आणि नवापूर येथील बांधकाम कामगार वगळता असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या नोंदण्याच नसल्याने तेथील कामगार या योजनेपासून वंचित राहणार असल्याची चिन्हे आहेत़ 18 ते 40 वयोगटातील किमान 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी मासिक उत्पन्नधारक असंघटित कामगारांसाठी ऐच्छिक निवृत्तीवेतन देण्याची ही योजना आह़े योजनेत सहभाग दिल्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपयांचे पेन्शन देण्यात येणार असून लाभार्थीच्या निवृत्तीवेतनाचा निधी एलआयसीकडे जमा करण्यात येऊन पेन्शन देण्याचे नियोजन केंद्रशासनाकडून करण्यात आले आह़े या कामगारांच्या नोंदणीसाठी सुविधा केंद्र स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ दोन दिवसांपूर्वी योजना सुरु झाली असली तरी जिल्ह्यात कामगार नोंदणी सुविधा केंद्र स्थापन करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत़ धुळे येथील कामगार अधिकारी यांच्याकडे नंदुरबार कार्यालयाचा अतिरिक्त पदभार आह़े जिल्ह्यातील कामगारांची संख्या पाहता योजनेसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करुन कामकाज करण्याची अपेक्षा कामगार संघटनांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े