नंदुरबारात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 12:58 IST2019-04-22T12:58:05+5:302019-04-22T12:58:10+5:30
नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी नंदुरबारात सभा होत आहे़ यासाठी सकाळपासूनच नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून कार्यकर्ते हजर ...

नंदुरबारात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते हजर
नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी नंदुरबारात सभा होत आहे़ यासाठी सकाळपासूनच नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून कार्यकर्ते हजर झाले आहेत़ सकाळी ११.३० वाजता सभेची वेळ निर्धारीत करण्यात आली होती़ परंतु नंदुरबारला येण्याआधी मोदी यांची पिंपळगाव (नाशिक) येथे प्रचार सभा असल्याने नंदुरबारची सभा साधारणत: दोन वाजेच्या सुमारास सुरु होण्याची शक्यता आहे़
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीनिमित्त नंदुरबारात प्रचारसभा होत असल्याने गेल्या आठवड्यापासून पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्याकडून तयारी करण्यात येत होती़ सोमवारी सकाळी नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते़ जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून महिला तसेच पुरुष मोदी यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले होते़ सभेला येणाऱ्या वाहनांमुळे सभास्थळी प्रचंड वाहतूक कोंडी झालेली दिसून आली़ सभेत सहभागी होणाºया प्रत्येकाची पोलीस प्रशासन तसेच विशेष सुरक्षा पथकाकडून कसून तपासणी करण्यात येत आहे़ सभेला विडी, घुटका, सिगारेट, आगपेटी, पेन आदी विविध वस्तूंवर बंदी घालण्यात आली होती़