पाणलोटचे श्रमदानातून कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:51 PM2020-11-27T12:51:53+5:302020-11-27T12:52:02+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  आसाणे गावाची नाबार्डतर्फे पाणलोट क्षेत्रविकास कामासाठी निवड करण्यात आली आहे. गावाने यापूर्वी वाॉटर कप ...

Work on the watershed begins with hard work | पाणलोटचे श्रमदानातून कामे सुरू

पाणलोटचे श्रमदानातून कामे सुरू

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  आसाणे गावाची नाबार्डतर्फे पाणलोट क्षेत्रविकास कामासाठी निवड करण्यात आली आहे. गावाने यापूर्वी वाॉटर कप स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षीस मिळवले आहे. सिंचनाबाबत गावात विविध उपक्रमांतर्गत कामे सुरू आहेत. गावकऱ्यांनी  श्रमदानातून कामाला सुरूवात केली असून, मोठा प्रतिसाद मिळत आहे. 
आसाणे येथे गेल्या दोन वर्षापासून डीएससी संस्था, पाणी फाऊंडेशन व ग्रामपंचायत संयुक्तपणे गावासाठी विकास कामे करीत आहेत. गेल्या दोन वर्षापासून गावातील शेतकऱ्यांना शाश्वत शेती व त्याबरोबर शेती जोड व्यवसाय कसा करता येईल वारंवार याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाते. डीएससी संस्थेचे मॅनेजर जितेंद्र सोनवणे यांना सरपंच  चंद्रकांत  पाटील यांनी विनंती केली की, गावात मोठा पाणलोट क्षेत्र उपलब्ध आहे. 
पाणी फाऊंडेशनच्या  स्पर्धेत गावकऱ्यांनी श्रमदानातून कामे केली आणि त्याचे समाधानकारक परिणाम पाणी पातळी वाढवण्यासाठी झाला. परंतु अजून मोठ्या प्रमाणावर  पाणलोट क्षेत्रात काम बाकी आहेत  तरी त्यासाठी डीएससी संस्थेने  निधी उपलब्ध करून द्यावा. त्यावर डीएससी संस्थेने नाबार्ड तर्फे प्रोजेक्ट राबवता येऊ शकतो याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांना दिला.  लगेचच नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक  प्रमोद पाटील  यांना आसाणे येथे पाणलोट क्षेत्र दाखवण्यासाठी  आणलं. जलद गतीने या प्रोजेक्टला मंजुरी दिली आणि साधारण दीड कोटी रुपये या प्रोजेक्टसाठी  देण्याचे आश्वासन दिले, पण त्यासाठी गावकऱ्यांनी दहा टक्के श्रमदान केले पाहिजे अशी अट असल्याचे   सांगितले. 
ग्रामस्थांनी गावानजीक असलेल्या धरणाचा गाळ श्रमदानातून काढला. आसाणे गावातील वन जमीन कृषी जमीन गावठाण गायरान असे एकूण पाणलोट क्षेत्र एक हजार हेक्टर आहे. याच्यावर काम करताना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा फायदा होईल. सर्वच ग्रामस्थांचे कौतुक जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड नंदूरबार   प्रमोद पाटील यांनी केले व  भूमिहीन  शेतमजुरांना  छोटे छोटे  व्यवसाय साठी  आर्थिक मदत देऊन  त्यांना  रोजगार  उपलब्ध  करून देण्यास  त्यांनी  विश्वास दिला.  व स्वतः श्रमदान करून गावकऱ्यांचा मनोबल  वाढवलं.

Web Title: Work on the watershed begins with hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.