‘यू-डायस फॉर्म’चे काम अंतीम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:53 IST2019-05-09T18:53:30+5:302019-05-09T18:53:56+5:30
१५ मे अंतीम मुदत : २ हजार ५७ शाळांपैकी ५० शाळांचे फॉर्म भरणे बाकी

‘यू-डायस फॉर्म’चे काम अंतीम टप्प्यात
नंदुरबार : जिल्ह्यातील शाळांची माहिती यू-डायस प्रणालीव्दारे संगणकीकृत करण्याची प्रक्रिया सध्या शिक्षण विभागाकडून सुरु आहे़ जिल्ह्यातील शाळांकडून आपआपल्या शाळेची संपूर्ण माहिती यू-डायस प्लस फार्मव्दारे भरण्यात येत आहे़ जिल्ह्यातील एकूण २ हजार ५७ शाळांपैकी ५० शाळांची माहिती भरण्याची प्रक्रिया बाकी असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे़
दरम्यान, शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मव्दारे ५ एप्रिल ते ५ मेच्या दरम्यान भरण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते़ परंतु ५ मेपर्यंत सुमारे ३५ टक्के शाळांनी आपआपल्या शाळांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मव्दारे भरलीच नसल्याचे चित्र होते़ त्यामुळे शासनाकडून हे फॉर्म भरण्याची मुदत वाढवून १५ मेपर्यंत करण्यात आलेली आहे़ त्यामुळे साहजिकच आता उवरलेल्या काही दिवसांमध्येच शाळांना युध्दपातळीवर आपली माहिती या प्रणालीव्दारे भरावी लागणार आहे़ शाळांची माहिती अंतिम झाल्यानंतर शासनाकडून शाळांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे़
दरम्यान, केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालय व समग्र शिक्षा या योजनेच्या तांत्रिक सहायक ग्रुप कार्यालयाने राष्ट्रीय रचना कार्यालयामार्फत पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा महाविद्यालयांची माहिती यू-डायस प्लस फॉर्मव्दारे संगणीकृत करण्यात येणार आहे़
दरम्यान, यू-डायस प्लस फॉर्म भरण्यासाठी संबंधित सर्वच शाळांना स्वतंत्रपणे आयडी व पासवर्ड देण्यात आलेला आहे़ शाळांची माहितीमध्ये कोणी छेडखाणी करु नये यासाठी आयडी व पासवर्डबाबत केवळ मुख्याध्यापकांनाच माहिती देण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़ त्यामुळे याचा वापर करुन शाळांच्या केवळ मुख्यध्यापकांनी आपल्या शाळेची सर्व माहिती या यू-डायस फॉर्ममध्ये संगणकीकृत करणे आवश्यक राहणार आहे़ दरम्यान, या माहीमध्ये शाळेची पटसंख्या, एकूण शिक्षक व कर्मचाऱ्यांची संख्या, विविध योजनांतर्गत मिळणारे अनुदान, शाळेतील भौतिक सुविधा, शाळेतील क्रीडांगण, खेळाची एकूण उपलब्ध साहित्ये, मुलींसाठी आवश्यक स्वच्छतागृह आदी विविध माहिती यू-डायस फॉर्ममध्ये भरणे आवश्यक राहणार आहे़
शाळा मुख्याध्यापकांनी १५ मेपर्यंत सर्व माहिती भरल्यानंतर मानव विकास विभागाकडून संबंधित शाळांनी भरलेल्या माहितीची जिल्हानिहाय ‘थर्ड पार्टी’कडून आॅडीट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे़ शाळांकडून भरण्यात आलेल्या माहितीमुळे केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांतर्गत देण्यात येणाºया अनुदानांची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात सुलभ होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे़ त्यामुळे उर्वरीत शाळांनी लवकरात लवकर १५ मेपर्यंत आपल्या शाळांची माहिती संकेतस्थळावर भरावी असे आवाहन करण्यात येत आहे़