घरकुलचे मुल्यांकन थांबल्याने कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:20 IST2020-05-14T10:20:05+5:302020-05-14T10:20:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना महामारीमुळे केंद्र शासनाकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका तळोदा तालुक्यातील साधारण चार हजार ...

Work stalled as assessment of Gharkul stopped | घरकुलचे मुल्यांकन थांबल्याने कामे ठप्प

घरकुलचे मुल्यांकन थांबल्याने कामे ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कोरोना महामारीमुळे केंद्र शासनाकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका तळोदा तालुक्यातील साधारण चार हजार घरकुल लाभार्र्थींना बसला असून, यामुळे घरकुलांचे पुढील मूल्यांकन होऊ शकले नाही. त्यामुळे पैशांअभावी कामच रखडल्याचे लाभार्थी सांगतात. आता शासनाने नियमात शिथिलता दिल्यामुळे तातडीने मूल्यांकन करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तळोदा तालुक्यात सन २०१९-२० मध्ये साधारण ४०८७ घरकुले मंजूर करण्यात आले आहे. एक लाख ३८ हजारांचे हे घरकुल आहे. त्यात १८ हजार रूपयांचे अनुदान रोजगार हमी योजनेतून दिले जात असते. शासनाकडून पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाल्यानंतर संबंधीत लाभार्र्थींनी घरकुलाचे कामदेखील युद्धपातळीवर केले आहे. कुणी लेंटल लेवळपर्यंत तर पायाच्यावर कामे केली आहेत. परंतु मार्च महिन्यात आपल्या देशाबरोबरच कोरोना या वैश्विक महामारीने आपले पाय पसरविणे सुरू कल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने साधारण दीड महिन्यापासून वाहतुकही पूर्णपणे बंद केल्यामुळे काम धंदेच बंद झाले. या लॉकडाऊनचा फटका तळोदा तालुक्यातील चार हजार घरकुलांना सुद्धा बसला आहे. आता सातत्याने बांधकाम व्यवसायांना लॉकडाऊनमधून शिथिलता दिली आहे. तथापि घरकुलांच्या पुढील मूल्यांकन न झाल्यामुळे लाभार्र्थींना पुढील रक्कन मिळाली नसल्यामुळे नाईलाजास्तव बांधकाम बंद करावे लागल्याचे सांगितले. ज्यांच्याकडे थोडीफार पुंजी होती. त्यांनी घरकुलात वापरून मोकळे झाले आहेत. पुढील पावसाळ्याचे काम कसे पूर्ण करायचे अशी चिंता सतावत असल्याचेही काही लाभार्र्थींनी बोलून दाखविली. प्रशासनाने युद्ध पातळीवर घरकुलांच्या पुढील मूल्यांकनाच्या प्रक्रियेसाठी संबंधत अभियंत्यांंना सूचना द्याव्यात. जेणे करून पुढील रक्कमही शासनाकडून तातडीने मिळविता येईल, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे.
दरम्यान, घरकुलांच्या रखडलेल्या मूल्यांकणाबाबत पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता कॉट्रॅक्टवरील कर्मचारी पर जिल्ह्यातील होते. लॉकडाऊनमुळे वाहतूकच बंद असल्याने ते येवू शकले नाही. नवीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांंना घरांचे मूल्यांकन करण्याबाबत सूचना दिल्या असून, दोन दिवसांपासून प्रत्यक्षात कामदेखील सुरू झाल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर घराची मूल्यांकणाची प्रक्रिया झाल्याबरोबर पुढील कार्यवाही सुद्धा तातडीने करण्यात येईल.

प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुलांचे काम युद्ध पातळीवर सुरू करून ते लेंटर लेव्हलपर्यंत आले आहे. परंतु कोरोनाच्या महामारीने केलेल्या लॉकडाऊनमुळे ते रखडले आहे. आता नियमात शासनाने सूट दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता मूल्यांकणाची कार्यवाही करावी. मला तिसरा व चौथा हप्ता मिळालेला नाही. पावसाळ्यापूर्वी घरकुल कसे पूर्ण होईल याची चिंता सतावत आहे. -जयेंद्र कांतीलाल पाडवी, लाभार्थी, तळवे, ता.तळोदा

Web Title: Work stalled as assessment of Gharkul stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.