वृक्ष लागवडीसाठी श्रमदानातून खड्डे खोदण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:12 IST2019-06-09T12:12:20+5:302019-06-09T12:12:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : टोकरे कोळी युवा मंच शहादा तालुका यांच्या वतीने आपणही निसर्गाचे काही देणं लागतो या ...

वृक्ष लागवडीसाठी श्रमदानातून खड्डे खोदण्याचे काम
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : टोकरे कोळी युवा मंच शहादा तालुका यांच्या वतीने आपणही निसर्गाचे काही देणं लागतो या उद्देशाने यावर्षी पावसाळ्यात शहादा शहरासह परिसरात विविध जातीचे 500 वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. वृक्ष लागवडीसाठी मंचच्या वतीने श्रमदानातून खड्डे खोदण्यात येत आहेत.
टोकरे कोळी युवा मंचच्या वतीने परिसरात पर्यावरणपूरक 500 वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सावखेडा ते कमरावदफाटा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा झाडे नसल्याने तेथे वृक्ष लागवडीसाठी पावसाळ्यापूर्वी खड्डे खोदून तयार आहेत. दोन-तीन पाऊस पडल्यानंतर जमिनीत गारवा तयार झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा या खड्डय़ांमध्ये सरळ उंच जाणारी, सावली देणारी, फळे-फुले येणारी झाडे अशोक, वड, चिंच, आंबा, कडूनिंब आदी वृक्ष लागवड करण्यात येणार असून प्रत्येक वृक्ष कसे जगेलया साठी मंचच्या वतीने काळजी घेणार असल्याचे सांगितले. पर्यावरणातील होत असलेले बदल, त्याचा शेती व शेतीपूरक धंद्यांवर होत असलेले वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवड उपयोगी ठरणार आहे. यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टींविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. गावाच्या परिसरात सार्वजनिक जमिनी, गायराने, शाळा-महाविद्यालय परिसर, पाण्याचे पाट, नद्या-नाले, तलाव, रस्ते, शेताचे रस्ते, शेताचे बांध आदी ठिकाणी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी गावात जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी टोकरे कोळी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष नितीन सुदाम कोळी, मंचचे सदस्य किरण निकुम, निलेश शिंदे, महेश कोळी, सचिन बागूल, मयूर शिंदे, अभिषेक निकम, विशाल कुवर, पंकज शिंदे, अजय निकुम, अभिषेक निकुम, अजय कोळी, वेदांत निकम, यश निकम आदी परिश्रम घेत आहेत.