देवमोगरा वसाहतीत दारूबंदीसाठी महिलांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:12 IST2020-09-15T12:12:12+5:302020-09-15T12:12:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा वसाहतमधील आदिवासी महिलांनी गावातील दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन पुकारून अवैध ...

देवमोगरा वसाहतीत दारूबंदीसाठी महिलांचे ठिय्या आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा वसाहतमधील आदिवासी महिलांनी गावातील दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन पुकारून अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर महिलांनी ठिय्या मागे घेतला.
सरदार सरोवर प्रकल्प बाधित झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा वसाहतीत काही व्यावसायिक राजरोसपणे अवैधरितीने दारू विक्री करीत आहेत. त्यामुळे वसाहतीमधील रहिवाशी दारूच्या व्यसनाला बळी पडत असून, दारूच्या व्यसनापायी आतापावेतो अनेकांना जीव गमवावा लागला आहे. एवढेच नव्हे वसाहतीतील ५०० पेक्षा अधिक कुटुंबांवर मृत्यूचे सावट आहे. पतीच्या दारू पिण्यावरून होणाºया भांडणात बायकांही मोठ्या प्रमाणात त्रासल्या आहेत. कोरोना पेक्षाही हा कहर अधिक गंभीर आहे. अवैध दारू विक्रीबाबत अनेकदा पोलिसात तक्रारी केल्या आहेत. शिवाय ग्रामसभेतही ठराव केला आ हे.तसा पाठपुरावाही शासनाकडे केला आहे. तथापि पोलिसांच्या थातूर-मातूर कारवामुळे पुन्हा काही दिवसानंतर पुन्हा दारू विक्री केली जाते. एखाद्या पोलिसाने कडक कारवाई केली तर त्याच्यावर खोटीनाटी आरोप करून खोटे आरोप पत्र दाखल केले जात असल्याी घटनादेखील घडली आहे. वास्तविक आमच्या वसाहतीत दूरवरून नर्मदा किनारी, मध्यप्रदेशातून दारू येत असते. मात्र पोलिसांंनाही अवैध दारूची वाहतूक दिसत नाही. त्यामुळेच अशा विक्रेत्यांचेदेखील फावत आहे.
गावातील जे दारू विक्री करणारे व्यावसायिक आहेत. त्यांना शासनाने नियमानुसार घर प्लॉट व जमिनी दिल्या आहे. तरीही दारूच्या अवैध व्यवसाय करून भरमसाट कमाई करीत आहेत.
साहजिकच वसाहतीतील घरभेदीच बायका, पोरांवरील अत्याचाराचे दोषी ठरत आहेत. त्यामुळे तालुका पोलीस प्रशासनाने देवमोगरा नगर वसाहतीमधील अवैध दारू विक्री करणाºया व्यावसायिकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून गावात संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी, अन्यथा या विरोधात पुन्हा तीव्र आदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महिलांनी दिला आहे.
या आंदोलनात नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, नंदा पाडवी, मंदा दिलवरसिंग पाडवी, रिना सुनील पाडवी आदींसह मोठ्या संख्येने महिला व नागरिक सामील झाले होते.