राष्ट्रवादी महिला बुथ कमिट्या सक्षम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:14 IST2020-09-14T12:14:17+5:302020-09-14T12:14:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : येत्या काही दिवसांत पार्टीच्या महिला बूथ कमिट्या रचनेच्या कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ...

राष्ट्रवादी महिला बुथ कमिट्या सक्षम करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : येत्या काही दिवसांत पार्टीच्या महिला बूथ कमिट्या रचनेच्या कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात व शहरात टप्प्याटप्प्याने बैठका घेण्यात येतील. बूथ कमिट्यांसाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागून त्या अधिकाधिक सक्षम कराव्यात अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या निरीक्षक मीनाक्षी चव्हाण यांनी केल्या.
नंदुरबार तेथे साई भगवती लॉन्स व शासकीय विश्रामगृहावर जिल्हास्तरीय महिला आघाडीची आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ.अभिजीत मोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती एम.एस गावित, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, शहादा पंचायत समितीच्या सदस्य ललिता बाविस्कर, मोहन शेवाळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, सुरेखा गावीत, पुष्पा गावीत, गितांजली गावीत, अलका जोंधळे, अॅड.अश्विनी जोशी, सब्बीबाई वळवी आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिला निरीक्षक मीनाक्षी चव्हाण म्हणाल्या, गेल्या २२ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिलांना न्याय मिळवून देत आहे.
पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार राजकारणात आले तेव्हा त्यांनी प्रथम जागतिक महिला धोरण कार्यक्रम राबविला. महिला धोरण राबवित असताना त्यांनी महिलांच्या समस्या, अडीअडचणी, घरगुती हिंसाचार, अत्याचाराचे प्रश्न सोडविण्याचे त्यांनी सांगितले
शरद पवारांनी महिलांना शिक्षण घेता यावे त्यांना अर्थकारण करायला व चूल आणि मूलच न सांभाळता त्यांनी राजकारणात यायला हवं यासाठी विशेष धोरण ठरविले. त्यामुळे आज पुरुषां पेक्षा महिला राजकारणात सक्रिय आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मी राष्ट्रवादीची हिरकणी' उपक्रम राबविण्यात आला होता. अनेक हिरकण्या आज सक्षम होऊन मोठं बळ मिळालेलं असल्याचे निरीक्षक मीनाक्षी चव्हाण यांनी सांगितले.
लॉन्समध्ये झालेल्या मेळाव्यात महिलांची उपस्थित मोठी होती. अभिजीत मोरे यांनी प्रास्ताविक केले. दुसऱ्या मेळाव्यात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले.
४राष्ट्रवादीअंतर्गत दोन गट आहेत. दोन्ही गटांचे वेगवेगळे मेळावे घेण्यात आले. यापूर्वी देखील राष्टÑवादीचे निरिक्षक आले असता त्यांनाही दोन वेगवेगळे मेळावे घ्यावे लागले होते.
४साई भगवती लॉन्समध्ये झालेल्या मेळाव्यात मात्र महिला कार्यकर्त्यांनी विद्यमान एका महिला पदाधिकाºया विरोधात तक्रारींचा पाढा वाचला. संघटन नसल्याने महिला कार्यकर्त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.