पुतीपाडा येथील महिलांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:11+5:302021-03-09T04:34:11+5:30

पाडलीच्या पुतीपाडा येथील अंगणवाडी केंद्राच्या आवारात २४० फुटापर्यंत हातपंपाचे पाईप टाकण्यात आले होते. मात्र हातपंप जेमतेम जानेवारी महिन्यापर्यंत चालतात ...

Women wandering for water in Putipada | पुतीपाडा येथील महिलांची पाण्यासाठी भटकंती

पुतीपाडा येथील महिलांची पाण्यासाठी भटकंती

पाडलीच्या पुतीपाडा येथील अंगणवाडी केंद्राच्या आवारात २४० फुटापर्यंत हातपंपाचे पाईप टाकण्यात आले होते. मात्र हातपंप जेमतेम जानेवारी महिन्यापर्यंत चालतात व त्यानंतर पाण्याची पातळी खाली गेल्याने हातपंप आटून पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या पाड्यावरील नागरिकांना दरवर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. येथे दोन हातपंप असून ते जून ते जानेवारी महिन्यापर्यंत जेमतेम चालतात. जानेवारी महिन्यातच हातपंपाच्या पाण्याची पाण्याची खाली जाऊन हे हातपंप आटतात. त्यामुळे या पाड्यांवरील महिलांना पाण्यासाठी डोंगरदऱ्याच्या चढउताराच्या पायवाटेने भटकंती करीत दोन ते अडीच किलोमीटरवर असलेल्या विहिरीतून व कालीबेल येथील हातपंपावरून पाणी आणावे लागते.

पुतीपाडा येथील अंगणवाडी केंद्राजवळ असलेला हातपंप जानेवारी महिन्यापासून आटल्याने तो निकामी झाला आहे. पाडलीच्या पुतीपाडा येथे पाण्यासाठी खालून पाईपलाईन करून किंवा हातपंपामध्ये मोटर टाकून पाणी आणून पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.

-कालूसिंग पाडवी, उपसरपंच, पाडलीचा पुतीपाडा

Web Title: Women wandering for water in Putipada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.