महिलांनी डिजीटल साक्षर होऊन विकास करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:00 IST2019-12-17T12:00:50+5:302019-12-17T12:00:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र व राज्य सरकारच्या महिलांच्या योजनांविषयी असलेल्या विविध अॅपद्वारे महिलांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू ...

महिलांनी डिजीटल साक्षर होऊन विकास करावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केंद्र व राज्य सरकारच्या महिलांच्या योजनांविषयी असलेल्या विविध अॅपद्वारे महिलांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. महिलांनी डिजीटल साक्षर व्हावे असे प्रतिपादन प्रशिक्षक पल्लवी सोमवंशी यांनी सांगितले.
नंदुरबार विधी महाविद्यालय येथे महिला डिजिटल साक्षरता अभियानाअंतर्गत कार्यशाळा झाली. प्राचार्य नितेश चौधरी, प्रा.एस. एस. हसानी उपस्थित होते. स्मार्टफोन हा फक्त बी घडवितो नाही तर हा घडवितो असे सांगत प्रशिक्षक पल्लवी सोमवंशी यांनी डिजिटल साक्षरता म्हणजे काय त्याची महिलांना काय गरज आहे हे महिलांना शिकविले. अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून उमंग नावाच्या अॅपद्वारे केंद्र सरकार राज्य सरकार व एजन्सिज च्या ४४० सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. महिलांना अनेक अडचणींना संकटांना तोंड द्यावे लागते त्यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या पाठीशी उभे असून आपल्या तक्रारीचे निवारण कसे करता येते व इतर वेगवेगळ्या सुविधा या अॅपवर कशा मिळवायच्या हे शिकविले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त फायदा घेऊन कुटुंबाला हातभार लावून कुटुंबाचा गावाचा व देशाचा विकास कसा करू शकतो असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन शुभांगी चौधरी यांनी केल. आभार प्रदर्शन प्रा. भावना वळवी यांनी केले.