आर्थिक फसवणूक करुन महिलेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 11:57 IST2019-06-22T11:57:10+5:302019-06-22T11:57:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिलेला लगAाचे अमिष दाखवत बलात्कार करुन पिडीतेची साडेआठ लाखात फसवणूक केल्याचा प्रकार शहाद्यात उघडकीस ...

आर्थिक फसवणूक करुन महिलेवर बलात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महिलेला लगAाचे अमिष दाखवत बलात्कार करुन पिडीतेची साडेआठ लाखात फसवणूक केल्याचा प्रकार शहाद्यात उघडकीस आला आह़े याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून संशयिताने महिलसोबतच्या संबधांचे मोबाईल चित्रीकरण करुन व्हायरल करण्याची धमकी दिली होती़
शहादा शहरातील पिडित महिलेची एकनाथ ओंकार कुवर रा़ ओझर्टे ता़ शहादा या शिक्षकासोबत ओळख होती़ ओळखीतून एकनाथ कुवर याने महिलेला लगAाचे अमिष देत ओझर्टे ता़ शहादा आणि प्रकाशा याठिकाणी घेऊन जात अत्याचार केला होता़ वेळोवेळी होणा:या संबधांचे चित्रीकरण करुन त्याची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत पिडित महिलेकडून साडेआठ लाख रुपये घेतले होत़े या बदल्यात प्लॉट नावावर करुन देण्याचे त्याने सांगितले होत़े परंतू प्लॉट नावावर न झाल्याने पिडितेने त्याच्याकडे पैश्यांसाठी तगादा लावला होता़ परंतू संशयित कुवर हा पैसे देण्यास नकार देत होता़ मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात हा प्रकार घडला होता़ फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने शहादा पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली होती़ पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित एकनाथ ओंकार कुवर याच्याविरोधात फसवणूक व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक आऱयू़ पाटील करत आहेत़
याप्रकरणी पोलीस संशयितास ताब्यात घेण्यासाठी गेले असता, तो मिळून आलेला नसल्याची माहिती देण्यात आली आह़े घटनेची शहादा शहरात एकच चर्चा सुरु आह़े