नंदुरबारातील अंधारे चौकात महिला पोलीस कर्मचा-यास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 17:10 IST2018-02-18T17:10:22+5:302018-02-18T17:10:29+5:30

युवकाविरोधात गुन्हा : डी़आर हायस्कूलजवळ घटना

The women police personnel in the darkness circle of Nandurbar scolded | नंदुरबारातील अंधारे चौकात महिला पोलीस कर्मचा-यास धक्काबुक्की

नंदुरबारातील अंधारे चौकात महिला पोलीस कर्मचा-यास धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील अंधारे चौक परिसरात युवकाकडून महिला पोलीस कर्मचा:यास धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली़ शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ 
शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकात नियुक्ती महिला पोलीस कर्मचारी मिना पवार ह्या शनिवारी सकाळी 11़15 वाजता अंधारे चौक परिसरातून डी़आऱहायस्कूल परिसरात आल्या़ या भागात शाळकरी मुली व महाविद्यालयीन तरूणींसाठी गस्त घालण्याचे आदेश मिळाल्याने पवार ह्या त्या भागात होत्या़ याचवेळी डी़आऱहायस्कूलसमोर तीन ते चार युवक उभे असल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल मीना पवार यांनी त्यांना हटकल़े यावेळी त्यातील भैय्या सुधाकर मराठे रा़ रायसिंगपूरा याने पवार यांच्यावर धाऊन जात त्यांना शिवीगाळ केली़ तसेच धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला़ या प्रकारानंतर कर्मचारी पवार यांनी पोलीस ठाण्यात येऊन वरिष्ठांना हा प्रकार सांगितला़ त्यांच्या फिर्यादीवरून भैय्या सुधाकर मराठे याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग करत आहेत़ शहरात या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून शाळांच्या परिसरात उभ्या राहणा:या टारगट युवकांचे घोळके चिंतेचा विषय बनत आह़े एकलव्य हायस्कूल, एस़ए़मिशन, डी़आऱहायस्कूल व काणे गल्र्स हायस्कूल या शाळांच्या बाहेर महागडय़ा दुचाक्या घेत हुंदडणारे पोलीसांनाही जुमानत नसल्याने नाराजी व्यक्त होत आह़े यातून शाळकरी विद्यार्थिनी धास्तावत असल्याचे दिसून आले आह़े 

Web Title: The women police personnel in the darkness circle of Nandurbar scolded