महिलांना कृतीयुक्त प्रबोधनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:30 IST2020-02-04T12:30:26+5:302020-02-04T12:30:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दैनंदिन गरजेच्या वस्तू मोठ्या कंपन्या तयार करुन नफा कमवतात. परंतु त्याच वस्तू तयार करुन ...

महिलांना कृतीयुक्त प्रबोधनाची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : दैनंदिन गरजेच्या वस्तू मोठ्या कंपन्या तयार करुन नफा कमवतात. परंतु त्याच वस्तू तयार करुन गरजू महिलांना स्वयंरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांपेक्षा अशा कृतीयुक्त प्रबोधनाची गरज आहे, असे प्रतिपादन नीलिमा मिश्रा यांनी येथे केले.
येथील जायण्टस् सहेली, जायण्टस् हिरकणी सहेली, पतंजली महिला योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथे हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त महिला सबलीकरण आणि वानप्रस्थाश्रम या विषयावर रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त तथा पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी ‘महिला प्रबोधन आणि सबलीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा करुणाबाई काशिनाथ पाटील होत्या. कार्यक्रमास उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, सुजाता पाटील, हैदरअली नुराणी, जायण्टस् सहेलीच्या अध्यक्षा सकीना राजा, मुख्याध्यापिका रिटा जैन, सरला गुजराथी, उमंग नारी ग्रुपच्या अध्यक्षा रत्ना पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जायण्टस्च्या फेडरेशन आॅफिसर संगीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन हिरकणी सहेलीच्या सचिव प्रा.गीता चौधरी तर आभार हिरकणीच्या अध्यक्षा किन्नरी सोनार यांनी मानले.
कार्यक्रमासाठी अर्जना सोनार, दिपाली बाविस्कर, प्रा.सुषमा मराठे, अलका जोंधळे, अॅड.भाग्यश्री पाटील, वैशाली कासोदेकर, नलिनी सोनार, मनीषा भावसार, वंदना चौधरी, जायण्टस् ग्रुपचे अध्यक्ष ईस्माईल राजा, हुसेन विरदेलवाला, सतीश जव्हेरी, प्राचार्य डॉ.एच.एम. पाटील यांनी सहकार्य केले.