महिलांनी जाणून घेतले पोलीस ठाण्यातील काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:24 IST2019-12-17T12:24:26+5:302019-12-17T12:24:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माविमतर्फे तयार करण्यात आलेल्या बचत गटातील महिलांनी कार्यात्मक साक्षरता प्रशिक्षणांतर्गत नंदुराबार तालुका पोलीस ठाण्याला ...

The women learned about the work of the police station | महिलांनी जाणून घेतले पोलीस ठाण्यातील काम

महिलांनी जाणून घेतले पोलीस ठाण्यातील काम

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माविमतर्फे तयार करण्यात आलेल्या बचत गटातील महिलांनी कार्यात्मक साक्षरता प्रशिक्षणांतर्गत नंदुराबार तालुका पोलीस ठाण्याला भेट दिली. यात त्यांनी तेथील कामकाज व महिलांविषयी कायदा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मागील नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ व नंदुरबार पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानंतर्गत नंदुरबारात प्रेरणा लोकसंचलीत साधन केंद्राच्या माध्यमातून बचत गट निर्मितीचे हाती घेण्यात आले आहे. यातून प्रत्येक वस्तीत १० ते २० गटांचा वस्तीस्तर संघ तयार करण्यात आले आहे. या संघातील पदाधिकारी व सदस्यांची भूमिका, जवाबदारी, व्यवस्थापन, व्हिजन बिल्डींग, लेखाविषयक व कार्यात्मक साक्षरतेचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. त्यात कार्यात्मक साक्षरता प्रशिक्षणांतर्गत संघाच्या महिलानी तालुका पोलीस ठाण्याला भेट देत तेथील कामकाज जाणून घेतले. शिवाय महिलांविषयक कायदे, पोलीस हेल्पलाईन याबाबत पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी माहिती दिली. पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलांपैकी बहुतांश महिलांनी ठाण्याचे उंबरठे पाहिले नसून पहिल्यांदाच पोहोचल्या त्यामुळे पोलीस ठाण्याबाबत त्यांच्यातील भिती काही अंशी दूर झाली आहे.
यावेळी प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा दीपमाला पाटील, माविमचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी जीवन गवळे, व्यवस्थापक तुषार पाटील, लेखापाल चेतना बागुल, क्षेत्रीय समन्वयक राणी बहिरम, खालेदा खाटिक, छाया माळी यांयासह बचत गटाच्या महिला उपस्थित होते.

Web Title: The women learned about the work of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.