प्रवासी वाहनातून पडून देवगाई घाटात महिला ठार

By Admin | Updated: June 19, 2017 11:33 IST2017-06-19T11:33:35+5:302017-06-19T11:33:35+5:30

अक्कलकुवा तालुक्यातील घटना

Women killed in passenger vehicles in Devgai Ghat | प्रवासी वाहनातून पडून देवगाई घाटात महिला ठार

प्रवासी वाहनातून पडून देवगाई घाटात महिला ठार

ऑनलाईन लोकमत 

नंदुरबार,दि.19 : अक्कलकुवा-मोलगी दरम्यान देवगोई घाटात भरधाव वेगातील प्रवासी वाहनातून पडून महिला ठार झाल्याप्रकरणी रविवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़ 
देवगोई घाटात मंदिराच्या खालच्या रस्त्यावर भरधाव वेगात जाणा:या खाजगी प्रवासी वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने खड्डय़ात आदळले. यामुळे आत बसलेल्या समकाबाई सुनील वसावे (55) रा़ डाब ता़ अक्कलकुवा ह्या बाहेर फेकल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ घटनेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आह़े 
शनिवारी दुपारी 3़30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघाताबाबत रविवारी मंगेश पुंडलीक चव्हाण रा़ सांगली़ ह़मु़ मोलगी यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: Women killed in passenger vehicles in Devgai Ghat