महिला महाविद्यालयाची नॅक समितीकडून पाहणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:49 IST2019-11-27T11:49:00+5:302019-11-27T11:49:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा तालुका एज्युकेशनल अॅण्ड को-ऑपरेटीव्ह एज्युकेशनल सोसायटी संचलित वरिष्ठा कला महिला महाविद्यालयाची नॅक समितीने ...

महिला महाविद्यालयाची नॅक समितीकडून पाहणी पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा तालुका एज्युकेशनल अॅण्ड को-ऑपरेटीव्ह एज्युकेशनल सोसायटी संचलित वरिष्ठा कला महिला महाविद्यालयाची नॅक समितीने दोन दिवस पाहणी केले.
या समितीत अध्यक्ष डॉ.एस.पी.अलगुर, समन्वयक डॉ.परवीन पंडित, सदस्या डॉ.हीना पटेल यांचा समावेश होता. समितीने पहिल्या दिवशी महाविद्यालयाच्या विविध विभागांना भेटी दिल्या. दुस:या दिवशी झालेल्या बैठकीत महिला महाविद्यालय चालविताना कोणकोणत्या अडचणी येतात व त्याच्यावर कशाप्रकारे मात करता येते याबाबत पिअर टीमने चर्चा केली. प्राध्यापक वर्ग कशाप्रकारे कार्यभार सांभाळतात याबद्दल सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पिअर टीमने महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील यांना नॅकचा अहवाल सादर केला. नॅकची श्रेणी मिळाल्यावर हा उघडण्याच्या सूचना दिल्या.
नॅक समितीच्या दोन दिवस चाललेल्या या तपासणीसाठी प्रा.राजेंद्र निकुंभे, प्रा.संतोष तमखाने, प्रा.के.जे. अनपट, प्रा.मंगला चौधरी, प्रा.मंगला पाटील, प्रा.रेणुका पाटील, प्रा.किरण माळी, प्रा.नितीश मराठे, प्रा.नेहा जैन, प्रा.जे.आर. पाटील, प्रा.किशोर माळी, प्रफुल्ल पटेल, प्रा.अनिल पाटील यांनी नॅक टीमचे नियोजन केले. तसेच विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचा:यांनी सहकार्य केले.