कोरोनासोबत लढा देण्याचा महिलांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:22 IST2020-03-16T12:21:58+5:302020-03-16T12:22:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील नावली व धवळीपाडा येथील महिलांनी पुढाकार घेत कोरोनाविषयी जनजागृती करण्याचा उपक्रम हाती ...

Women are determined to fight Corona | कोरोनासोबत लढा देण्याचा महिलांचा निर्धार

कोरोनासोबत लढा देण्याचा महिलांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील नावली व धवळीपाडा येथील महिलांनी पुढाकार घेत कोरोनाविषयी जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ यांतर्गत येथील महिला गावात जागृती करण्यासोबत स्वच्छता करुन नागरिकांना स्वच्छ राहण्याचे सल्ले देत आहेत़
नावली येथे गेल्या आठ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला होता़ यावेळी महिलांनी एकत्र येत वृक्षसंगोपन आणि कोरोना आजारावर जनजागृती करण्याचा निर्धार केला होता़ या उपक्रमानंतर गेल्या आठवडाभरापासून महिला दोन्ही गावात वृक्षसंगोपन, कचरा मुक्त गाव आणि कोरोनापासून बचाव यांचा जागर करत आहेत़ त्यांच्या या अनोख्या प्रयत्नामुळे गाव चकाचक झाले असून मुलांना हात धुण्याचे प्रशिक्षण देत स्वच्छता ठेवण्याचा आग्रह या माता धरु लागल्या आहेत़
कोरोना आजार तसेच प्लास्टीकचे होणारे दुष्परिणाम यावर ग्रामसेविका व्ही.एम.जाधव यांनी महिलांना माहिती दिल्यानंतर हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे़ यात जिल्हा परिषद सदस्या सुशीलाबाई कोकणी, सरपंच गौरीबाई कोकणी, उपसरपंच निताबाई कोकणी, ओम साई महिला ग्रामसंघ नावली, (उमेद) शीतल प्रधान, गीता प्रधान, नीता प्रधान, भारती गावीत, गंगा वळवी, संगीता प्रधान, रमिला वळवी ह्या महिलांसह गावातील इतर महिलाही सहभागी होत असून त्यांच्या या प्रयत्नाने गावात सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे़

महिलांकडून दररोज नावली आणि धवळीपाडा येथे कोरोनाबाबत जागृती करुन अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगण्यात येत आहे़ ग्रामस्थांनी कोरोना आजाराबाबत शासनाकडून जनजागृतीसाठी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे़ जंगल कमी होत असल्याने पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने वृक्ष लागवड अन संगोपन करण्याचा निर्धार केला असून हातात झाडू घेऊन त्या सर्व गावात स्वच्छता करण्यावर भर देत आहेत़ महिलांच्या या उपक्रमाची सध्या गावोगावी चर्चा असून कोरोनावर कोणतेही प्रशिक्षण न घेता ग्रामीण भागातील महिला जागृती करत असल्याने त्यांचे कौतूक करण्यात येत आहे़

Web Title: Women are determined to fight Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.