लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतातील बांध फोडण्याच्या वादातून महिलेच्या डोक्यात दगड टाकला तर तिच्या पतीला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना शिंदे, ता.नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजबाई प्रकाश माळी व प्रकाश माळी असे जखमींची नावे आहेत. तर मनिलाल शिवदास पाटील, प्रकाश शिवदास पाटील, नाना शिवदास पाटील व आणखी एकजण अशा जचार जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, राजबाई प्रकाश माळी यांच्या शेतातील बांध पाटील परिवार खेडत होते. त्याबाबत माळी यांनी जाब विचारला असता त्याचा राग येऊन चौघांनी महिलेस दगड मारून तिचे डोके फोडले. याशिवाय प्रकाश माळी यांना लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. याबाबत राजबाई माळी यांनी फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवलदार नागरे करीत आहे.
शेतातील बांध फोडण्याच्या वादातून महिलेचे डोके फोडल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 12:03 IST