बसस्थानक आवारातून महिलेची सोनपोत लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST2021-02-05T08:10:02+5:302021-02-05T08:10:02+5:30
नंदुरबार : बसस्थानकातून महिलेच्या गळ्यातील ५० हजारांची सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा ...

बसस्थानक आवारातून महिलेची सोनपोत लंपास
नंदुरबार : बसस्थानकातून महिलेच्या गळ्यातील ५० हजारांची सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिनाभरात अशा प्रकारची ही दुसरी घटना घडली आहे.
नंदुरबारातील बन्सीलाल नगर भागात राहणाऱ्या मीना रमेश पाटील या २८ रोजी सकाळी बसस्थानकात आल्या असता त्यांच्या नकळत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र असलेली पोत चोरट्यांनी चोरली. त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ठिकठिकाणी तपास केला, मात्र मिळून आली नाही.
याबाबत मीना पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार प्रवीण महाले करीत आहे.
दरम्यान, महिनाभरात बसस्थानकात चोरीची ही दुसरी घटना घडली. पहिल्या घटनेत चोरी करणाऱ्या महिलांपैकी दोघींना पकडण्यात आले होते. तरीही चोरीच्या घटनांना आळा बसत नसल्याची स्थिती आहे.