गुरे चारण्याच्या वादातून महिलेस डेंगाऱ्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:01 PM2019-12-12T12:01:35+5:302019-12-12T12:01:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील चिमणीपाडा येथे शेतात गुरे चारले या कारणातून महिलेस डेंगाºयाने मारहाण केल्याची घटना ...

A woman was stabbed to death by a cattle herd | गुरे चारण्याच्या वादातून महिलेस डेंगाऱ्याने मारहाण

गुरे चारण्याच्या वादातून महिलेस डेंगाऱ्याने मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील चिमणीपाडा येथे शेतात गुरे चारले या कारणातून महिलेस डेंगाºयाने मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे़
चिणमीपाडा येथील लिलाबाई सुभाष वळवी ह्या त्यांच्या शेतात मंगळवारी दुपारी गुरे चारत असताना काल्या आतºया वळवी याने माझ्या शेतात गुरे चारली असे सांगून वाद घातला होता़ दरम्यान त्याने त्याच्या हाताील डेंगाºयाने लिलाबाई यांच्या डोक्यावर मारुन दुखापत केली होती़
यावेळी त्याच्या सोबत असलेल्या राजू आतºया वळवी व आतºया रामदास वळवी या दोघांनीही लिलाबाई यांना हाताबुक्कीने मारहाण करुन जखमी करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ याबाबत लिलाबाई यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन काल्या, आतºया व व राजू वळवी या तिघांविरोधात गुन्हा दाखल असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चौरे करत आहेत़

Web Title: A woman was stabbed to death by a cattle herd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.