डाकीणच्या संशयावरून महिलेस दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:49 IST2020-12-15T12:48:47+5:302020-12-15T12:49:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : जुगणीचा पेचरीपाणीपाडा,ता.धडगाव येथे महिलेस तू डाकीण आहेस, माझ्या मुलास तूच मारून टाकले असा आरोप ...

डाकीणच्या संशयावरून महिलेस दमदाटी
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : जुगणीचा पेचरीपाणीपाडा,ता.धडगाव येथे महिलेस तू डाकीण आहेस, माझ्या मुलास तूच मारून टाकले असा आरोप करून मारून टाकण्याची धमकी दिली, दमदाटी केली या बाबत महिलेच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रानुसार, फिर्यादी एमनीबाई लाला वळवी रा.जुगणिचा पेचरीपाणीपाडा ता, धडगाव या महिलेला तिच्या गावातील आरोपी रायसिंग इरमा वळवी, बिंद्या इरमा वळवी यांनी रायसिंगचा मुलगा अनिल हा नवरात्री व दसरा सण दरम्यान शारीरिक आजाराने मरण पावला त्याचे वाईट वाटून फिर्यादीवर संशय व्यक्त केला. व एमनीबाईस तू डाकीण आहेस,तू आमच्या मुलास जादूटोणा करून मारले,तू गावातून निघून जा असे आरोप करून शिवीगाळ व दमदाटी केली, मारून टाकण्याची धमकी दीली. दरम्यान, सदर भांडण हे गावातील लोकांनी बैठक बसवून मिटवण्याचा प्रयत्न केला पण भांडण मिटले नाही. त्यावरून फिर्यादी महिलेने भावाशी, घरातील लोकांशी सल्लामसलत करून ऊशीरा फिर्याद नोंदवण्याचे कारण म्हटले आहे. दोन्ही आरोपींविरूद्ध म्हसावद पोलीसात महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधीतअधिनियम कायदा कलम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. जमादार भगवान धात्रक, हवालदार दिलीप सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.