महिला शक्तीचा झाला जागर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:14 IST2020-03-09T14:14:35+5:302020-03-09T14:14:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :महिला दिनानिमित्त रविवारी महिला शक्तीचा जागर झाला. दिवसभर विविध उपक्रमातून महिलांचा सन्मान करण्यात आला. विविध ...

Woman power is awakened ... | महिला शक्तीचा झाला जागर...

महिला शक्तीचा झाला जागर...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :महिला दिनानिमित्त रविवारी महिला शक्तीचा जागर झाला. दिवसभर विविध उपक्रमातून महिलांचा सन्मान करण्यात आला. विविध समाज संघटनांनी एकत्र येत एकत्रीत कार्यक्रम साजरा केला. मोटरसायकल रॅली, चौक सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहिली. मोटरसायकल रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, वकील यांच्यासह सामान्य गृहिणी देखील या रॅलीत सहभागी होऊन महिला शक्तीचा जागर दाखवून देत होत्या. शहरातील विविध भागातून ही रॅली निघून डी.आर.विद्यालयात समारोप झाला.

Web Title: Woman power is awakened ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.