महिला रुग्णावर डॉक्टरकडून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:16 IST2019-09-21T12:16:23+5:302019-09-21T12:16:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या महिलेवर डॉक्टरने अत्याचार केल्याची घटना शहरात ऑगस्ट महिन्यात घडली होती़ याप्रकरणी ...

महिला रुग्णावर डॉक्टरकडून अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या महिलेवर डॉक्टरने अत्याचार केल्याची घटना शहरात ऑगस्ट महिन्यात घडली होती़ याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयित डॉक्टरला पोलीसांनी अटक केली आह़े
अनुप शामल मुजुमदार असे संशयित डॉक्टरचे नाव असून तो कासारगल्लीत आयुव्रेदिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करतो़ 13 ऑगस्ट रोजी बाहेरगावाहतून आलेली एक महिला अनुप मुजुमदार याच्याकडे तपासणीसाठी गेली असता, तपासणीचा बहाणा करत डॉ़ मुजुमदार याने महिलेवर अत्याचार केला़ घटनेच्या काही दिवसांनंतर 24 ऑगस्ट रोजी महिला पुन्हा उपचार आणि औषधांसाठी दवाखान्यात गेली होती़ यावेळी संशयित डॉ़ मुजुमदार याने पिडितेवर पुन्हा अत्याचार केला़ घटनेनंतर महिलेची तब्येत खराब झाल्याने तिच्यावर उपचार करण्यात येत असल्याने गुन्हा करण्याची प्रक्रिया गुरुवारी सायंकाळी पूर्ण करण्यात आली़ शहर पोलीस ठाण्यात पिडित महिलेच्या फिर्यादीवरुन संशयित डॉ़ अनुप मुजुमदार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे डॉ़ मुजुमदार यास शहर पोलीसांच्या पथकाने अटक केली होती़ उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी भेट देत घटनेची माहिती घेतली होती़ घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची शहरात एकच चर्चा सुरु आह़े दरम्यान अटक करण्यात आलेला डॉ़ अनुप मुजुमदार यास शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होत़े न्यायालयाने डॉ़ मुजुमदार यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आह़े या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियदर्शनी थोरात ह्या करत आहेत़ घडलेल्या या घटनेमुळे गत दोन दिवसांपासून उलटसुलट चर्चा होत आहेत़ रुग्ण तपासणीदरम्यान हा प्रकार झाल्याने पोलीसांकडून कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े