नंदुरबार जिल्ह्यातील महिलेचा नाशिक येथे कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 17:24 IST2020-05-27T17:23:59+5:302020-05-27T17:24:09+5:30
नंदुरबार : कोरोनाचे प्रलंबीत अहवाल अखेर बुधवारी सकाळी प्राप्त झाले. तब्बल ७३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दुसरीकडे मुळची सोमावल, ...

नंदुरबार जिल्ह्यातील महिलेचा नाशिक येथे कोरोनाने मृत्यू
नंदुरबार : कोरोनाचे प्रलंबीत अहवाल अखेर बुधवारी सकाळी प्राप्त झाले. तब्बल ७३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दुसरीकडे मुळची सोमावल, ता.तळोदा येथील ४२ वर्षीय महिलेचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला.
सोमवाल येथील ४२ वर्षीय महिला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोनाची लक्षणे आढळल्याने स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे बुधवारी ७३ अहवाल निगेटिव्ह आले. सर्व अहवालांमध्ये पॉझिटिव्ह नऊ रुग्णांच्या संपर्क साखळीतील लोकांचा समावेश आहे. त्यामुळे नंदुरबार, रजाळे व पॉझिटिव्ह रुग्ण शहादा तालुक्यातील ज्या गावांमध्ये गेला होता त्या गावातील ग्रामस्थांना हायसे वाटले आहे.
याशिवाय जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांच्या स्वॅब अहवालाचा देखील त्यात समावेश आहे. आता आणखी २७ अहवाल वेटींगवर आहेत.